Ahamadnagar येथे पद्मगंगा फौंडेशन चा राज्यस्तरीय लोकगंगा पुरस्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन
तेजवार्ता चे संपादक सय्यद बबलूभाई यांना राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार जाहिर
अहमदनगर (प्रतिनिधी ) -
स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर गंगाधर मोरजे स्मुर्ती दिनानिमित्त आयोजित पद्मगंगा फाउंडेशन अहमदनगरच्या राज्यस्तरीय लोकगंगा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 9 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे . हा पुरस्कार वितरण सोहळा अहमदनगर येथे हमालपंचायत भवन , मार्केट यार्ड या ठिकाणी संपन्न होणार आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमाल पंचायतचे अध्यक्ष मा .अविनाश घुले पाटील हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून मा . प्राचार्य अनिल सहस्त्रबुद्धे , मा . प्रा . डॉ . मु .सा . बागवान , मा . प्रा. डॉक्टर संदीप सांगळे हे उपस्थित राहणार आहेत . याप्रसंगी मा . प्राचार्य आर . के . अडसूळ ( सुखाचे मानसशास्त्र ) , मा .प्रतिभा खैरनार (बाभूळ फुल ) , मा . जगन्नाथ वर्तक (मेरी ) , मा. प्रतिभा जाधव (दहा महिन्यांचा संसार ) यांना ग्रंथ पुरस्कार देण्यात येणार आहेत . तसेच मा . राजेश गंगाराम उल्लेवार , मा .हनुमंत मल्लू काऊलवार आणि रावसाहेब राघूमोड , मा . आप्पासाहेब कोंडीबा आगाशे ( आष्टी ) यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . तसेच तेजवार्ता चे संपादक सय्यद बबलू वजीर ( आष्टी ) यांना पत्रकारिता पुरस्कार व मा . दिगंबर अर्जुन जोगदंड ( आष्टी ) यांना शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . पद्मगंगा फाउंडेशनचे हे सोळावे वर्ष आहे .या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ . धोंडीराम वाडकर ,उपाध्यक्ष श्री मिलिंद चवंडके , सचिव डॉ. ज्ञानेश ऐतलवाड यांनी केले आहे .
stay connected