युवा नेते जयदत्त धस यांच्या हस्ते कडा येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा होणार संपन्न..!

 युवा नेते जयदत्त धस यांच्या हस्ते कडा येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा होणार संपन्न..!

--------------------


संदिप जाधव/आष्टी

तालुक्यातील कडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे.यामध्ये शिवछत्रपती चौक व भाजी मंडई येथे तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांच्या कामांचा उद्घाटन युवा नेते जयदत्त भैय्या धस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.


उद्या दिनांक ३० जूलै कडा येथे सकाळी ठिक ११ :०० वाजता शिव छत्रपती चौक भाजी मंडई येथे विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी असणारी कडा ग्रामपंचायत ही विधानसभेचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे.आणि या ग्रामपंचायतला आमदार धस यांनी विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे.

उद्या होणाऱ्या विविध विकास कामांच्या शुभारंभाला सुरूवात होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच युवराज पाटील यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत रमजान तांबोळी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, ग्रामसेवक आबासाहेब खिलारे, योगेशशेट भंडारी,जयंत खंदारे, प्रशांत देशमुख सह सर्व ग्रा.पं.सदस्य उपस्थित राहणार आहेत.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.