एक दिवसीय चिंतन शिबिरास भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे - नंदकुमार मस्के, बालासाहेब जोगदंड, डॉ.प्रभाकर ठोके

 एक दिवसीय चिंतन शिबिरास भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे - नंदकुमार मस्के, बालासाहेब जोगदंड, डॉ.प्रभाकर ठोके 



केज/ प्रतिनिधी


केज शहरातील वएळूवन बुद्धविहार भीमनगर येथे एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा केज आणी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा केज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या एक दिवसीय चिंतन शिबिरास भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा आणी शहर शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस बालासाहेब जोगदंड यांनी केले आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता एक दिवसीय चिंतन शिबीरास सुरुवात करण्यात येणार आहे.एक दिवसीय चिंतन शिबिर हे दोन सत्रात घेण्यात येणार आहे या शिबीरास भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मस्के तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष डॉ.प्रभाकर ठोके,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीड जिल्हा पूर्वचे सरचिटणीस एस.बी. शिंदे,बीड पूर्वचे कार्यालयीन सचिव पंकज भटकर,बीड पूर्वचे संघटक मधुकर कदम,बीड पूर्वचे संघटक अरुण पटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एक दिवसीय चिंतन शिबिरास सकाळी ठीक ११- ०० वाजता सुरुवात करण्यात येणार आहे व ४-३० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.तरी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखेच्या सर्व पदाधिकारी यांच्यासह सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष नंदकुमार मस्के सरचिटणीस बालासाहेब जोगदंड शहर अध्यक्ष डॉ.प्रभाकर ठोके यांनी केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.