केज येथे भारतीय बौद्ध महासभेचे चिंतन शिबीर संपन्न

 केज येथे भारतीय बौद्ध महासभेचे चिंतन शिबीर संपन्न...



केज (प्रतिनिधी) दि ३० रोजी 

केज शहरातील वेळुवन बौद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेचे एक दिवसीय चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले होते. ३० जूलै रोजी दुपारी १२:०० वाजता चिंतन शिबीराचे उद्घाटन उद्घाटक नंदकुमार मस्के व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रभाकर ठोके, एस बी शिंदे, अरूण पटेकर, मधूकर कदम, पंकज भटकर व सर्व भारतीय बौद्ध महासभेचे उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व प्रथम भारतीय बौद्ध महासभेची आचारसंहिता हा विषय अरूण पटेकर यांनी सांगितले. आपली बोली भाषा, बौध्दाचार्य यांचे वर्तन तसेच बुद्ध आणि धम्म याचे वाचन केले पाहिजे. तसेच धुम्रपान व्यसनाधिनता करु नये. सामाजिक व धार्मिक वाद होईल असे बोलू नये असे आपल्या विषयांमध्ये अरुण पटेकर यांनी सांगितले.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती हा विषय एस बी शिंदे यांनी सांगितला. ते सांगताने म्हणाले की, "गुलामीला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटुन उठेल"

असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.सामाजिक समता व बंधुता लोकशाही निर्माण करण्यासाठी फार मोठे हाल सोसावे लागले. देशात मोठी विषमता असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ रोजी येवला या ठिकाणी मी हिंदू धर्माचा त्याग करतो अशी घोषणा केली व १९५६ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. तथागत गौतम बुद्ध यांनी अष्टांग मार्ग सांगितले आहेत त्याचा आपण आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे.असे आपल्या विषयांमध्ये सांगितले. तसेच दुसऱ्या सत्रात मधूकर कदम यांनी सभासद नोंदणी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यालयीन कामकाज व लेखा परीक्षण कसे असावे हे पंकज भटकर यांनी सांगितले व  चिंतन शिबिराचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण डॉ प्रभाकर ठोके यांनी केले व आभार सरचिटणीस बालासाहेब जोगदंड यांनी केले.व समारोप शरन्तय घेऊन करण्यात आला...

या वेळी नंदकुमार मस्के, डॉ प्रभाकर ठोके,एस बी शिंदे, मधूकर कदम, अरूण पटेकर,पंकज भटकर, बालासाहेब जोगदंड,तुपसागर,खरात, बाबा पोटभरे,ढालमारे, जयपाल मस्के, महादेव गायकवाड, शिवकुमार मस्के,पत्रकार रंजित घाडगे,महिला बौद्ध उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते..






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.