Ahamadnagar muharram 2023 : अहमदनगर येथे ऐतिहासीक मोहर्रम सण उत्साहात संपन्न
अहमदनगर - ऐतिहासिक मोहरम उत्सव नऊ तारखेची कत्तलची रात्र व दहा तारखेची मोहरम विसर्जन मिरवणुकीमध्ये अहोरात्र जागून कष्ट करणारे आमचे पोलीस बंधू आणि भगिनीं यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी श्री. राकेश ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुसूचित प्रकार न होता मोहरम सन शांततेत पार पाडला आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब सर यांचे आरिफ भाई शेख जिल्हा अध्यक्ष भूमी अभिलेख कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ यांनी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत केले असे प्रतिपादन आरिफ भाई शेख यांनी व ज्येष्ठ कामगार नेते एन.एम.पवळे साहेब कास्ट्राइब महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष यांनी व जिल्हा अध्यक्ष के.के. जाधव यांनी केले आहे.
मोहरम सणाला दि. २० जुलैपासून प्रारंभ झाला होता . शुक्रवारी रात्री १२ वाजता कत्तलची रात्र मिरवणूक काढण्यात आली . शनिवारी दुपारी १२ वाजता मोहरम उत्सव विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . मोहरम उत्सव शांततेत होण्यासाठी अधीक्षक ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सुमारे ६५० समाजकंटकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे.
मिरवणुकीचे ड्रोन, व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक १, पोलीस उपअधीक्षक ४, पोलीस निरीक्षक २४, सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक ४५, अंमलदार ६४५, आरसीबी २ प्लाटून, सीआरपीएफ १ कंपनी, होमगार्ड २५० असा बंदोबस्त ठेवण्यात आला . मिरवणूक मार्गावर १०५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.


stay connected