मणिपूर घटनेचा आष्टीकरांकडून उद्या जाहीर निषेध करून तहसील दारांना देणार निवेदन
आष्टी ( संदीप जाधव ) - मणिपूर येथील महिलांवर झालेल्या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दि. २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथील डॉ आंबेडकर चौकातून निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सामाजिक संघटना,सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना व सर्व राजकीय पक्ष सहभागी होऊन सर्वांच्या वतीने मणिपूर घटनेचा रॅलीत जाहीर निषेध करण्यात येणार आहे. मणिपूर च्या क्रूर घटनेमुळे देश व समाजासमोर जे आव्हान निर्माण झाले आहे त्याचा सामना करून अत्याचार करणाऱ्यांवर शासनाने कठीण कारवाई करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे या पद्धतीची मागणी ह्या निवेदनामध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये अजीमुद्दीन शेख [शेतकरी संघटना], प्रा बाळासाहेब मिसाळ ( संरक्षक - छत्रपती क्रांती सेना ) , शिवाजी सुरवसे ( अध्यक्ष - शेतकरी कामगार पक्ष ) ,डॉ शिवाजी शेंडगे[ रासप ], डॉ महेश नाथ [आम आदमी पार्टी ], रवी ढोबळे [काँग्रेस ], कैलास दरेकर [मनसे ], ऍड. निंबाळकर[बीआरएस], दीपक उंबरकर[ मनसे], सामाजिक कार्यकर्ते प्रा. राम बोडखे ,परमेश्वर घोडके, महेश मुरकुटे, शकील पठाण, दीपक गरुड [स्वा रि पार्टी ], ऍड.संभाजी दहातोंडे, किरण आखाडे [वंचित आघाडी ], मुकंद कोल्हे व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत . तरी सर्व जनतेने या प्रसंगी रॅलीत सहभागी होऊन अन्याया विरोधात तिव्र निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात आहे .


stay connected