उल्हासनगर येथील विजया लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये झालेल्या चोरीचा तपास ठाणे क्राईम ब्रांच ठाणे यांच्या कडे सोपवावा
उल्हासनगर दि :- शिरू चौक उल्हासनगर येथील विजया लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये झालेल्या चोरीचा तपास ठाणे क्राईम ब्रांच ठाणे यांच्या कडे सोपवावा अशी मागणी १४१ उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशना मध्ये विधानभवनातील उपमुख्यमंत्री कार्यालयात भेट घेऊन केली आहे.
कॅम्प नंबर २ शिरु चौक येथे विजयालक्ष्मी ज्वेलर्स आहे. या दुकानात सुमारे ३ कोटी रुपयांच्या दागिनांची चोरी झालेली आहे. या चोरी मध्ये वॉचमनसह त्यांची पत्नी व तीन साथीदरांचा समावेश सीसीटीव्ही कॅमेराव्दारे उघड झाले आहे. यामुळे उल्हासनगर शहरातील व्यापार्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटना आणि त्यातील सुरक्षारक्षकाचा गुन्हेगार म्हणून असणारा सहभाग पाहता नागरिक आणि व्यापारी याच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीचा तपास तातडीने लावावा अशी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र ४ यांच्याकडे व्यापारी यांच्यासह समक्ष भेटून आमदार कुमार आयलानी यांनी केली होती. परंतु विजयालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी होवून बराच कालावधी झालेला असून अद्यापही याबाबात चोरांना पकडण्यात आलेले नसल्याने व्यापाऱ्यामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून सदर चोरीचा तपास ठाणे क्राईम ब्राँच कडे सोपवावा अशी मागणी स्थानिक व्यापारी व नागरिक यांनी केलेली आहे.
तरी उल्हासनगर मधील विजयालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये झालेल्या चोरीचा तपास ठाणे क्राईम ब्रॉव मार्फत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी विंनती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


stay connected