श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्थेत पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम व शालेय साहितेसह फळ वाटप ; टोकवाडी भाजपाचा उपक्रम

 श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्थेत पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम व शालेय साहितेसह फळ वाटप ; टोकवाडी भाजपाचा उपक्रम



*जनसामान्यांसाठी काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पंकजाताई-संजय मुंडे*


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपा टोकवाडी व भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांच्या पुढाकारातून लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या  वाढदिवसा निम्मीत टोकवाडी येथील श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था येथे शालेय साहित्यसह फळ वाटप करून ताईसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमात बोलतांना भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे म्हणाले की, सत्ता असो किंवा नसो सर्व सामान्यांसाठी सदैव सेवेत असणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पंकजाताई मुंडे होत.  

       महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राच्या रणरागिणी वंचित   उपेक्षितांच्या कैवारी गोरगरिबबांचा आधार लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी तालुक्यातील टोकवाडी येथील श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील शालेय विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्यसह फळ वाटप करण्यात आले. 

         राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेलं संकट लक्षात घेऊन वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंकजाताईंनी घेतला होता. त्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस टोकवाडी भाजप व तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांच्या पुढाकारातून आज सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्यसह फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.  यावेळी या प्रसंगी भाजपचे तालुका उपाध्यक्ष श्री संजय मुंडे सर,भाजपचे जेष्ठ नेते श्री टी. डी. मुंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री वाल्मिक मुंडे, मा. उपसरपंच संदीप काळे, ग्रामपंचायत सदस्य श्री तुकाराम मुंडे, सुखदेव मुंडे, नागनाथ मुंडे, अंनत मुंडे, युवा नेते तुकाराम मारोती मुंडे, मीनानाथ मुंडे, श्री संभाजी आघाव, माऊली मुंडे, राजेश मुंडे आदी टोकवाडी येथील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार ह. भ. प. श्री जगदीश महाराज सोनवणे यांनी केले.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.