शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि विकासासाठी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल -------Suresh Dhas

 शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि  विकासासाठी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल 
------- Suresh Dhas

*******************************

विधानपरिषदेत कृषी विषयावर अभिनंदन प्रस्तावावर आ.धस यांचे अभ्यासपूर्ण भाषण

*******************************



*******************************

आष्टी (प्रतिनिधी)

राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन कृषी क्षेत्राशी निगडीत असल्याने शेती हे अन्नधान्य, रोजगार व उपजीविकेचे साधन आहे. राज्यातील शेतकरी समर्थ व स्वावलंबी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतीचे उत्पादन व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास या धोरणाला विद्यमान महायुती सरकारने परमोच्च स्थान दिले आहे.

शेतकरी स्वयंनिर्भर व्हावा या उद्देशाने विविध नवनव्या योजना विद्यमान शासनाने हाती घेतल्या आहेत. असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी कृषी विषयक प्रस्तावावर सरकारच्या अभिनंदन ठरावावर बोलताना केले.

    ते पुढे म्हणाले,२०१५ साली सुरू झालेली महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना महाविकास सरकारने बंद केली यावेळी हायकोर्टाने निर्णय देत ही योजना चांगली असल्याचे सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा शिवसेना महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर जलयुक्त शिवार टप्पा २  ही योजना चालू करून त्यासाठी ५४५ कोटी रुपयांची तरतूद  सरकारने केली त्याचबरोबर नानाजी देशमुख, पोखरा आणि जलयुक्त शिवार अशा योजनातून महायुती सरकारने खूप चांगले काम केले आहे. शेळीपालन, गाई पालन या योजनेत महिलांचा सहभाग होणे गरजेचे आहे. या सरकारमध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये अनेक आमच्या भागातील धरणे गाळमुक्त झाले असून या योजनेमुळे प्रत्येक धरणामध्ये पाणी अडवले गेले या पाणी अडवल्यामुळे पावसाचा खंड पडल्यानंतर या बंधाऱ्यातील शेतीला पाणी मिळाल्यानंतर ही बाब महत्त्वाची ठरली आहे. पशुधनाबाबत हे सरकार अतिशय जागृत असून लंपी सारखा आजाराची मोफत लस देऊन शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन लसीकरण करण्यात आले असल्याने अनेक जनावरांचे प्राण जगवण्याचे काम या सरकारने केले आहे. या लंपीच्या आजाराबाबत आता पुणे येथे देखील लस निर्मिती केली जात आहे. परळी,आंबेजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत ५० हजार रुपये अनुदानासाठी वंचित असलेले अनेक शेतकरी असून कृषीमंत्र्यांनी या अनुदानासाठी विशेष लक्ष देऊन तात्काळ त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मिशन २०१५ हा सौर उर्जेवरील असलेला महत्त्वाकांक्षी कार्यक्रम उपमुख्यमंत्री तथा वीजमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून आमच्या भागातील शेतकरी यासाठी शेतजमीन देण्यास तयार असून हा अतिशय उपयुक्त कार्यक्रम असल्याने महायुती सरकारचे आ.धस यांनी अभिनंदन केले.पुढे बोलताना धस म्हणाले जलसंधारणाच्या सर्वाधिक योजना यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. पाणी अडवून, जमिनीत जिरवणे गरजेचे असल्याने जलयुक्त शिवार योजना टप्पा २ राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील "पंचामृत" संकल्पनेत "शाश्वत शेती - समृध्द शेतकरी " हे प्रथम अमृत असून त्याअनुषंगाने राज्यातील पीक विमा योजना व्यापक प्रमाणात राबविली जात आहे. 

                कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविणे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पुढे सुरु ठेवणे,पशुजैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती सुरु करणे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देणे अशा विविध योजना राबवून सरकार शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम युती सरकारने केले असल्याचे प्रस्तावाला पाठींबा देत सरकारचे आ.धस यांनी शेवटी अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.