आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्शदपुर ग्रा.पं.अंर्तगत ६० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण
************************************
************************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची असलेली मुर्शदपुर-कासारी-शिदेवाडी ग्रामपंचायत आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात आल्यापासून अनेक विकास कामे होताना दिसत आहेत.यामध्ये ६० लक्ष रुपये खर्चून विविध विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले असल्याची माहिती सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,भाजपा पदाधिकारी,आ.सुरेश धस मित्र मंडळ सदस्य यांनी दिली आहे.
कासारी-मुर्शदपुर-शिदेवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या अंतर्गत शहरी भाग येत असल्याने आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विविध विकासकामांचे कामे प्रगतीपथावर असून मागे १ कोटी ३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामानंतर आता ६० लक्ष रुपयांचे विविध विकास कामे पूर्णत्वास गेली असून रस्ते कामामुळे मुर्शदपुर भागातील
रस्त्यांची दैना फिटली आहे. या ६० लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांमध्ये
वार्ड क्र.१ वडारवस्ती येथे मनरेगा अंतर्गत प्लेविंग ब्लॉक १० लक्ष रुपये खर्चून बसविण्यात आले.वार्ड क्र.२ माऊलीनगर भागात जनसुविधा योजने अंतर्गत मंगरूळ ते दत्ता जाधव घर १० लक्ष सिमेंट रस्ते व मंगरूळ रोड ते खोले फौजी घर १० लक्ष सिमेंट रस्ता करण्यात आला आहे. वार्ड क्र.३ दत्तनगर येथे दलित वस्ती योजनेच्या अंतर्गत ५ लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता करण्यात आला आहे.वार्ड.३ दत्तनगर येथे आमदार सुरेश धस यांच्या आमदार फंडातून १० लक्ष रुपयांचे खडीकरण करण्यात आले आहे.वार्ड.३ विनायकनगर येथे आ.सुरेश धस यांच्या आमदार फंडातून १० लक्ष रुपयांचे खडीकरण करण्यात आले आहे.
कासारी गावात दलित वस्ती योजनेच्या ५ लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता करण्यात आला आहे.या विविध विकास कामांचा समावेश असून मुर्शदपुर भागातील टकाटक आणि चकाचक रस्ते झाल्याने आ.सुरेश धस यांचे तसेच सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,भाजपा व आ.सुरेश धस मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त केली जात आहे.





stay connected