जिजाऊ ब्रिग्रेडच्या वतीने आष्टी शहरातील विविध शासकीय कार्यालयात वृक्षारोपण
जिजाऊ ब्रिग्रेडच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा गि-हे यांचा स्तुत्य उपक्रम
देवळाली प्रतिनिधी अतुल जवणे :
वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या अवतीभोवती असणारी झाडे आपल्याला फक्त प्राणवायूच न देता इतर अनेक गोष्टीही देतात. वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते. थोडक्यात एकप्रकारचा निवाराच मिळतो. वृक्ष आपले मित्रच आहेत या अनुषंगाने आष्टीत जिजाऊ ब्रिग्रेडच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीने व सामाजिक क्षेत्रात योगदान असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा बाळासाहेब गि-हे यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम शहरातील तहसील कार्यालयात व माऊली मंदिर परिसरात तसेच कन्या शाळेच्या आवारात शुक्रवार दि २१ जूलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले तर तहसील कार्यालयातील आवारात तहसीलदार प्रमोद गायकवाड, नायब तहसीलदार बाळदत्त मोरे,नायब तहसीलदार विनायक धावने, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत कन्हेरे, लक्ष्मणराव रेडेकर, मंडळ अधिकारी सोनाली कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
मनुष्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात त्यापासून विविध औषध बनवली जातात. ते औषध वापरून बऱ्याच आजारांवर मात केली जाते. थोडक्यात झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते. त्याचप्रमाणे पाऊस पडण्याचे महत्त्वाची भूमिका देखील वृक्षांन मार्फत पूर्ण होते त्यामुळे सर्वांनी आप आपल्या पद्धतीने झाडें लावून जगावे असे आवाहन जिजाऊ ब्रिग्रेडच्या आष्टी तालुकाध्यक्षा सुवर्णा गि-हे यांनी बोलताना केले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्षा सुवर्णा गि-हे, उपाध्यक्षा माधुरी तवले, कार्याध्यक्षा अनिता निंबोरे, शहराध्यक्षा विद्या चव्हाण, सचिव वर्षा शिंदे, सहसचिव छाया कदम,कोषाध्यक्षा रत्नमाला चाळक,मनिषा चौरे, प्रतिभा जोगदंड, संगिता पोकळे,आशा शिंदे,शालन मुळे, योगिता पोकळे यांनी केले होते.यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अविनाश जगताप, बापुराव मोरे, सिताराम पोकळे, मुख्याध्यापक सुरेश पवार, दिपक पोकळे,राघव केरूळकर, शिक्षक तळेकर,आजबे,गळगटे यांच्यासह जिजाऊ ब्रिग्रेडच्या महिला,मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


stay connected