अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते झटपट करोडपती कसे व्हावे पुस्तकाचे प्रकाशन

 अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते झटपट करोडपती कसे व्हावे  पुस्तकाचे प्रकाशन 

====================




    ( प्रतिनिधी आशा रणखांबे )


 ठाणे 


       शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखक अमोल मोहन   निरगुडे उर्फ अ नि र यांनी लिहिलेल्या ' झटपट करोडपती कसे व्हावे ' या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते रविवार 30 जुलै 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याच्या मराठी ग्रंथ 

संग्रहालयात  संपन्न  होणार आहे. यावेळी मराठी ग्रंथ  संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, प्रा. रुपेश महाडिक विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री प्रा.प्रज्ञा पंडित करणार  आहेत. वाचन संस्कृती अधिक वाढीस लागावी यासाठी या प्रकाशन सोहोळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वाचकाला शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या इतर गाजलेल्या लेखकांची दोनशे रुपये किंमतीची पुस्तके विनामूल्य दिली जाणार आहेत.

            रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या या प्रकाशन सोहोळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन युथ एंटरटेनमेंट चे प्रमुख दीपेश पाटील यांनी केले आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.