भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचच्या अनुराधा वायकोस यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचच्या अनुराधा वायकोस यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर



राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि श्रावस्ती सामाजिक, शैक्षणिक, संशोधन प्रतिष्ठान परळी वैजनाथ यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. 

या पुरस्कारांमध्ये परभणी येथील प्रसिद्ध कवयित्री गझलकारा सौ. अनुराधा वायकोस यांना साहित्यिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल २०२३ या वर्षीचा उत्कृष्ट साहित्यिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. परभणी जिल्ह्यातील सौ. अनुराधा वायकोस यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्री. संतोष जाधव यांनी दिली.

सौ. अनुराधा वायकोस यांचे हा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष विशाल सिरसट, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व स्तरातून  त्यांचे अभिनंदन होत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.