Aam Admi Party : जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद व अनेकांनी केला पक्ष प्रवेश
अमरावती ( प्रतिनिधी ) -
आम आदमी पार्टी अमरावती महानगर तर्फे स्वराज संवाद काॅनर सभा रविवार दि ०२-०७-२०२३ रोजी सायंकाळी ९ वाजता गुलजार नगर येथे नागेश लोणारे युवा अध्यक्ष व नईम शेख यांच्या नेतृत्वात मध्ये स्वराज्य संवाद काॅनर सभा घेण्यात आली.स्वराज्य संवाद काॅनर सभा संपन्न झाली. अमरावती महानगर अध्यक्ष डॉ पंकज कावरे व संघटन मंत्री अॅड.डॉ. प्रविण बारंगे यांनी गुलजार नगरमध्ये रविवासी असणाऱ्या नागरिकांना संबोधित केले.व साजिद शेख यांना युवा अल्पसंख्याक अध्यक्ष पदाची जबाबदारी आम आदमी पार्टी अमरावती महानगरच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थित देणात आली. गुलजार नगर मध्ये राहणाऱ्या नागरीकांनी तिथली समस्या सांगितल्या की नळ संध्याकाळी ११ वाजता येतात, नाली साफ करण्यासाठी मनपाचे साफ सफाई कर्मचारी येत नाही, कचरांची गाडी येत नाही, डेंग्यू सारख्या बिमारी होण्याची भीती वाटते.असे आम आदमी पार्टीच्या पदाधिकारीकडे समस्या सांगितल्या यावेळी अरबाज शेख, आसिफ शेख, वाजिद शेख, तनवीर अहमद, साकिब शेख, हर्ष खान, मुजाहिद खान, मोहम्मद रफिकुद्दीन, फारुक भाई, तौसिफ खान, सलमान खान, अजिम खान, सलमान भाई, गुलामभाई, सुफियान भाई, सोनू खान ,सय्यद भाई, मुशर्रफखान, मुजाहिदखान, मुजाहिद खान, अवाजीद शेख, मोहम्मद अफतर, मोहम्मद सुलेमान, अरबाज खान, आसिफ शेख, शेख सोहेल, आदिल खान, अफाम अहमद ,अहमदभाई, सोहेल खान, नाजिम खान वाजिद रॉयल, रिजवान खान,मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
stay connected