News Update : जनता कॉलेज चे उपप्राचार्य एन डी चव्हाण सेवानिवृत्त
आष्टी तालुक्यातील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथे उपप्राचार्य पदावर कार्यरत असलेले प्राध्यापक नामदेव चव्हाण हे शासकीय नियमाप्रमाणे दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले यानिमित्त त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 4 जुलै रोजी जनता कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल हे होते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार साहेबराव दरेकर पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके माजी सभापती अंकुश चव्हाण संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल भाई सरपंच सौ सविता सुभाष शेळके माजी सरपंच राजाभाऊ शेळके प्राचार्य उत्तम गव्हाणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश शेळके पांडुरंग आण्णा चव्हाण माजी प्राचार्य गव्हाणे सर , शेख सलीम भाई ( कॅशियर )आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य बी .पी . कर्डिले यांनी केले तर आभार प्राध्यापक गलांडे सर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार सर यांनी केले . याप्रसंगी संस्थेच्या वतीने तसेच धानोरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रा .नामदेव चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच विविध मान्यवरांनी त्यांच्यावर सत्काराचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी प्रा. गुलाब धारक , प्रा . बशीर सय्यद , प्रा जगताप , मुख्याध्यापक सय्यद वाय.यु . , उपमुख्याध्यापक शिवाजी ढोबळे , बांदल मॅडम , पर्यवेक्षक सय्यद ए . डी . , प्रा गांगर्डे सर तसेच सर्व प्राध्यापक , शिक्षक , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते .
stay connected