Pik vima केज येथे पीक विमा भरण्यासाठी जनजागृती गाडीला तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दाखवला ग्रिन सिग्नल ..
शेतकऱ्यांना एक रुपयात भरता येणार ३१ जुलैपर्यंत विमा
केज (प्रतिनिधी) दि ४ रोजी खरीप पीक विमा भरून घेण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा भरता येणार आहे विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली आहे पिक विमा जनजागृती आठवड्याच्या निमित्ताने केज तालुका तहसील कार्यालय येथे तहसीलदार अभिजीत जगताप व तालुका कृषी अधिकारी एस एस पठाडे तसेच विमा प्रतिनिधी राहुल चवरे विमा प्रतिनिधी गायकवाड विशाल व इतर यांनी आज सकाळी दहा वाजता तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी पिक विमा भरणा जनजागृती गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रचार करण्यासाठी परवानगी दिली आहे.त्याकरीता
सर्व शेतकऱ्यांनी एक रुपया मध्ये आपला पिक विमा भरून घेण्याचे आवाहन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी या निमित्ताने सांगितले.
stay connected