Team India Updated Schedule: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल; पाहा संपूर्ण सामन्यांची यादी
भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी बीसीसीआय आणि आयसीसीने वेळापत्रकाची घोषणा देखील केली आहे. यापूर्वी ८ संघ ठरले होते.
आता वनडे वर्ल्डकप पात्रता फेरीतील सामने जिंकून आणखी २ संघांनी टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. ज्यात श्रीलंका आणि नेदरलँड या दोन्ही संघांचा समावेश आहे. दरम्यान आता भारतीय संघाचं अपडेटेड वेळापत्रक समोर आलं आहे. (Team India Updated Timetable) वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले संघ...
नेदरलँडचा संघ हा आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरणारा १० वा संघ ठरला आहे. यापूर्वी ८ संघ थेट वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी पात्र ठरले होते. तर श्रीलंका संघ या स्पर्धेत प्रवेश करणारा ९ वा संघ ठरला होता. स्कॉटलँड आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. नेदरलँडने बाजी मारली आणि भारतात येण्याचं तिकीट मिळवलं आहे.
भारत नेदरलँड केव्हा येणार आमने सामने?
भारत -नेदरलँड (India VS Netherlands) सामना ११ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. हा भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. नेदरलँड संघ देखील दमदार कामगिरी करतोय. त्यामुळे नेदरलँडला हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
असे आहे भारतीय संघाचे अपडेटेड वेळापत्रक
८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू
stay connected