ARTICAL : माणुसकी सारी विटली,का करते तिची मी अपेक्षा ?
काय होते?काय झाले?
नशिबी मरण आले
होत्याचे नव्हते होता
मन आज सुन्न झाले...
उराशी भव्य स्वप्न इमला बांधून प्रत्येकजण आपला प्रवासाला लागला होता.मना कधी विचार ही शिवला नसेल की,मी रात्रीतून कायमचा दूरदेशी जाणार? हे माझे शेवटचे बोलणे,शेवटचे खाणे ठरेल?कोणीच कोणाला परत न भेटण्याच्या वाटेवर कायमचे निघून जाणार?जीवंतपणी आपला असा कोंडून, आगेत कोळसा होणार?किती यातना झाल्या असतील त्या देहांना..काय टाहो फोडला असेल? ते ऐकायलाही तेथे कोणी नाही?लवकरच घटनास्थळी पोहचून ही परिस्थितीमुळे मदत ही करता येईना..समोरचे विदारक चित्र उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय बचाव पथकाकडे पर्याय नव्हता.सारे हतबल झाले होते?नियतीने जणू हातचं बांधून ठेवले होते?किती दुःखदायक विदारक घटना प्रसंग.दुश्मनावर ही अशी वेळ येवू नये.मनात असून हातांनी काही करता येत नाही? हात बांधले गेले? काळाने असा विदारक घाला घालावा.किती मोठे दुर्देव्य.काय वाटले असेल त्या जीवांना..पूर्वी जसे पती मृत्यू नंतर पत्नीला त्याच चितेवर जिवंतपणी ढकलून,फेकून जाळले जात होते.तिचा टाहो ऐकायला कोणी जात नव्हते?किंवा ऐकून न ऐकल्यासारखे करत होते.तशीच ही घटना..ना दोष तिचा न त्यांचा? पण निरपराध्याला शिक्षा.
त्या मन सुन्न करणाऱ्या बातम्या पाहून,आजही अंगावर काटा येतो?असे किती दिवस घडणार? हे चित्र कधी बदलणार?असेच निरपराध बळी जात राहणार का?हे चित्र कोठे तरी थांबले पाहिजे ना? कोणाच्या जीवाशी खेळणे किती माणूस घाणे? धोकादायक?तुम्ही पैसे कमावण्यासाठी काहीही करणार का? तुमचा जीव किंमती तसा इतरांचा नाही का? हृदय हेलवणारी घटना? मन आहे का नाही?असेल तर ते मेले का? डोळ्यांनी ही दिसत नाही का? कान ही बंद पडले का? तो टाहो ऐकू येत नाही का?जीवनाच्या प्रवासात प्रत्येक ठिकाणी नियम असावा?नियम असेल तर त्याचा फायदा नक्कीच अचूक होतो.भरधाव वेगाने गाडी चालवणे?डुलकी लागणे,जेवण खूप करून गाडी चालवणे,दारू पिऊन गाडी चालवणे?काही तरी विचार हवा की नाही? तुमच्या सोबत इतरांचाही जीव तुमच्या हातात असतो.विश्वास असतो तुमच्या गाडी चालविण्याच्या कौशल्यावर? कारण त्याही जीवावर अवलंबून असणारे त्यांचे ही कुटुंब असते.
येथे आमची चूक नाही? असे बोलून प्रश्न सुटतो का? नशिबाचा खेळ? आलेय भोगाशी,असावे सादर..बोलून चालते का? काय झाले त्यांच्या नशिबाला? हीच जर नियमात गाडी चालवली असती तर अशी घटना घडली असती का? माणूस आहे ,चुकतो? पण,किती वेळा चुकावे? त्याला ही काही मर्यादा असतात ना? थांबवा हा जीवघेणा अत्याचार? खाजगी बसचेच असे कितीतरी अपघात होतात?का होतात? तरी त्यांना जाब का विचारला जात नाही.लांब पल्ल्याचा प्रवास रात्रीचा सोपा होतो मान्य पण,काही विचारपुर्वक का होत नाही? व्यवस्थित झोप झालेला,न पिणारा,सुज्ञ,प्रामाणिक ड्रायव्हर असावा ना? ज्याच्या हातात पूर्ण सूत्र देतो,तो माणूस तर योग्य दर्जाचा असावा की नाही.गाडी चालवणे शक्य होत नसेल तेव्हा थांबणे केव्हाही उत्तमच ना?त्यावर उपाय करावा?
समृद्धी महामार्ग किती सुंदर,सरळ महामार्ग...तरी अपघात होतात?का?मोठा जीवघेणा प्रश्न आहे?प्रगती झाली पण,त्याचा काय उपयोग? अन् किती दिवस हे असे सत्र चालणार?साहित्याच्या वाटेवर जातांना,तो उघड्या डोळ्यांनी आपण अनुभवला होता हाच मार्ग,
शब्द शब्द पेरून वाटेवरती
फुलविला साहित्याचा मळा
माणुसकी,आपलुकी आटून
आज कोरा जीवनाचा फळा..
ज्या मार्गावरून उन्हाळ्यात वर्धा येथे हजारोच्या संख्येने साहित्यिक मराठी साहित्य संमेलनास शब्द रिते करण्यासाठी गेले होते? त्या महामार्गाचा आस्वाद प्रत्येकाने घेतला होता.अन्,त्याच मार्गावर असा भयाण अपघात होतो?कोणाच्या मनाला हा प्रश्न का शिवत नाही? नुसती हळहळ व्यक्त करून उपयोग काय आपल्या लेखणीचा?या लोकांना,या सरकारला प्रश्न विचारण्यास आपली लेखणी का धजावत नाही?लाज वाटते का? का कमीपणा वाटतो ?का भीती वाटते? आपण काही लिहिले तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेलं?आपल्याला शिक्षा होईल?प्रेम,निसर्ग,राजकारण,सुखाचे प्रसंग अशा ना प्रसंग,घटना आपण आपल्या साहित्यातून लेख,काव्य, सदर रूपातून मांडत,चालवत असतो? मग आता काय झाले तुमच्या लेखणीला? त्या लेखणीला थोडी धार द्या..अन् शब्दांनी ती तळपवा?काहीना दुरूनच गंमत बघायला आवडते?आम्ही तुमच्या दुःखात सामील आहोत.असे बोलून प्रश्न सुटणारा आहे का?कधी त्या मृत् प्रवाशांच्या जागी स्वतः लाही ठेवून पहा,काय वेदना होतात? काय घडले असेल त्यांच्या बाबतीत.कल्पनाही करू शकणार नाही? असे तुमच्या बाबतीत,तुमच्या कुटुंबाबाबत,मित्र मंडळी,नातेवाईक यांच्या बाबत भविष्यात पुन्हा कधीच घडू नये?असे वाटत असेल तर आता तरी लेखणी उचला ?अन् व्यक्त व्हा! त्या निरपराध आत्म्यांना शांती द्या.त्यांच्या नातेवाईकांना काही तरी आशा द्या?सात्वनांचा एक शब्द तरी द्या... अहो,येथे अपराध्याला ही चांगली वागणूक देतात?त्याची सेवा करतात?तेथे माणुसकी दाखवली जाते मग,अशा प्रसंगी काय होते?बोटात लेखणी बसत नाही का? तिला शब्द फुटत नाही?का मन धजत नाही?का मनच नाही?हृदय धडधड करते ना,तनात एक थेंब रक्ताचा आहे तो पर्यंत जिवंत प्रश्नांवर लिखाण करा ओ? जे जिवंत आहे त्यांच्या साठी? जे कोणाच्या तरी चुकीमुळे कायमचे जीव सोडून गेले? त्यांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील त्या नजरेसमोर आणा? अहो,एकाच क्षणात निरपराध २५ जीवांचा होरपळून कोळसा होतो? काय घडले,कसे घडले? त्यापेक्षा,असे अजून किती दिवस घडणार आहे? याचा जाब प्रत्येक ट्राव्हेल्स एजन्सी ला विचारला पाहिजे ना?त्यांना अचूक फाईन केली पाहिजे ना ? ठोस,अंतिम निर्णय यावर झालाच पाहिजे ना.पैसे मोजून ते जीव परत आणता येणार आहेत का? एकुलते एक लेकरे होती काही? काहींना आई आहे तर बाप नव्हता..बाप आहे तर आई नव्हती..कोणी बापाला,कोणी नवऱ्याला,कोणी मुलांना भेटायला जात होते.साखर झोपेत होते..मस्त जेवण करून काही शांत झोपी गेले होते? अन् ती झोप विदारक चिरशांती देवून गेली.
वर्धा वाटेवर तेव्हा
काव्य सुमने सजली
समूहाने सारी प्रेते
अंती स्मशानी जाळली..
चिमुकल्यांपासून ते वृध्दांपर्यंतचे प्रवासी डोळ्यात काही स्वप्न घेवून निघाले होते? त्या स्वप्नांचा अक्षरशः चिरडा झाला.नोकरी,शिक्षण,भेटीसाठी जात असताना ही दुर्घटना घडली.काळाने झडप घातली?बस सोबत आयुष्याचा,त्या जीवांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या स्वप्नांचा ही कोळसा झाला.राहिली घटनास्थळी फक्त राख?अन् नातेवाईकांकडे फक्त आठवणी? जे मुले कुटुंबाचे आधार बनणार होते,त्यांनाच काळाने हिरावले,त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.कोणी थांबवू शकाल का?त्या दुःखी मातांचा आक्रोश?सात्वनांचे कोरडे शब्द ही फिके पडतील. आपल्या पोटच्या गोळ्याचा असा दुर्देवी मृत्यू कोण सहन करू शकेल का?
नाना जाती धर्माचे,पंथाचे लोक एकत्र प्रवास करत होते?त्यांचा शेवटी बुलढाणा येथे सार्वजनिक अंत्यसंस्कार केला गेला?त्यांना ना घरचा उंबरा पाहता आला की,ना अंघोळ मिळाली ?काय,कसे अचानक घडले?
ज्या रस्त्यावर शब्द सुमने उधळीत गेलो,त्याच रस्त्यावर आज निरपराध दूरदेशी गेले..आपल्या आयुष्यात माणूस म्हणून स्वतः शी तरी प्रामाणिक रहा,तुम्ही नेते नाहीत ओ....साधी माणसे आहात हे तरी विसरू नका? इतके ही स्वार्थी बनू नका? रात्रीतून पलटी खाऊ नका? माणूस आहात तर माणूस म्हणून जगा ना? हिंस्त्र श्वापद बनू नका?भावनाशील असावे हो,भावनाहिन जगणे नसते? तुम्ही सत्तेसाठी/ राजकारण साठी नका धजू,कारण त्यांचा भरवसा कोणालाच देता येणार नाही?कोण कधी पलटेल याचा भरवसा नाही? त्यांना ना नाते समजते ना?ना माणुसकी? दिसते फक्त खुर्ची,प्रसिध्दी,पैसा? काय काय घेवून जाणार आहेत वर कोण जाणे?त्यांना काही फरक पडत नाही? एकाच घरात एक तोंड इकडे तर दुसरे दुसरीकडे..अशी यांची स्थिती?कोण नाही त्यांना वाली? जे फक्त सत्तेचे भिकारी?लालची?धूर्त? विश्वास घातकी? सरड्यासम वृत्ती? पण या निरपराध जीवांसाठी तरी लेखणी हाती घ्या?यांना न्याय मिळून द्या? पुन्हा असे बळी जाणार नाही ? यासाठी अचूक पावले उचलण्यासाठी? झाकलेले डोळे उघडण्यासाठी? वैचारिक,भावनिक,अंजन घालू या....माणुसकी हृदयाहृदयात,रोमारोमात पेरू या..
सर्व मृत् आत्म्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!!! असे पुन्हा घडू नये यासाठी हात हाती घेवू या.
stay connected