NCP गरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारे शरद पवार Sharad Pawar

NCP गरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारे  शरद पवार Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे NCPअध्यक्ष वयाच्या 83 व्या वर्षी मोठ्या राजकीय आघाताचा सामना करत आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी मोठं बंड पुकारलंय. ते विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन ते सत्ताधारी भाजपसोबत गेले आहेत. त्यांच्या निर्णयाचं शरद पवार यांनी समर्थन केलेलं नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पण अजित पवार यांनी पक्षावरच थेट दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार हे अडचणीत आले आहेत. पण त्यांच्यात आजही अफाट माणुसकी आहे. नाशिकच्या निफाड येथे ही माणुसकी बघायला मिळाली.
Sharad Pawar


शरद पवार Sharad Pawar यांनी पक्ष स्थापन केला, मोठा केला, अनेकांना संधी दिली, मोठं केलं. पण आज तीच आपली माणसं शरद पवार यांच्यापासून लांब गेली आहेत. हा शरद पवार यांच्यावरील केवढा मोठा आघात आहे. पण पवारांनी हार मानलेली नाही. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या संयम ढळू दिलेला नाही. याउलट वयाच्या 83 व्या वर्षीदेखील आपण माणुसकी जपू शकतो हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे.
शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष समाजासाठी घालवली. त्यामुळे समाजाच्या भल्यासाठीच ते झटले. त्यामुळे वयाच्या 83 व्या वर्षी कोणत्याही व्हीआयपीचा बडेजाव न करता ते गरिबांच्या मदतीसाठी धावून जातात. त्यामुळेच त्यांच्यावर राज्यभरातील जनता प्रेम करते.
शरद पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या येवल्यात त्यांचं जंगी स्वागत झालं. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तळागळातील कार्यकर्ते आजही आहेत. हे आजच्या दौऱ्यातून दिसून आले. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्या माणुसकीचं देखील दर्शन झालं.
शरद पवार येवल्याला जात असताना निफाड येथील पिंपळस गावाजवळ एक लालपरी (एसटी) खराब झालेली दिसली. एसटी खराब झाल्यामुळे अनेक प्रवासी रस्त्यावर उभे होते. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. या रस्त्याने जात असताना शरद पवार यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी वेळेचा विलंब न करता या प्रवाशांना आपल्या ताफ्याच्या गाड्यांमध्ये बसवलं.
शरद पवार यांनी बंद पडलेल्या एसटीच्या प्रवाशांना आपल्या ताफ्यातील गाड्यांमध्ये बसायला सांगितलं. लहान मुलं आणि महिलांना या ताफ्यामध्ये घेण्याची विनंती करण्यात आली. शरद पवार यांच्या या कृतीचं आता कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.