भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत स्पर्धेत डॉ. मयुरी आंधळे विजेत्या

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत  स्पर्धेत  डॉ. मयुरी आंधळे विजेत्या

   


   राष्ट्रीय स्तरावरील साहित्य क्षेत्रातील आघाडीचे नाव भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित "वेदना स्त्री मनाची" या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत डॉ. मयुरी गजानन आंधळे विजेत्या ठरलेल्या त्या बद्दल साहित्य क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे. 

   खर तर या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत ४७० हुन आधिक कवयित्री सहभागी झाल्या होत्या. लेखक  प्रा. डॉ. सातपुते यांनी काटेकोरपणे या स्पर्धेचे परीक्षण करून योग्य क्रमांक काढले. डॉ मयुरी यांनी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच साहित्य क्षेत्रातील लिखाणाची आवड जपली आहे.  आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे.  'खर तर स्त्रींयाना अनेक अडचणींना , संकटांना समोरे जावे लागते त्यातूनही त्या यशस्वी मार्ग काढतात. महिलांना कुठेतरी मनातल्या वेदना लिहायला  हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच स्पर्धेचा हेतू होता' असे संस्थे संस्थापक उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.