JALGAON | अमळनेरातील निरपराध लोकांना अटक करण्याचे काम सरकार आणि पोलिसांच्या वतीने सुरू - आ. अनिल पाटील

 JALGAON | अमळनेरातील निरपराध लोकांना अटक करण्याचे काम सरकार आणि पोलिसांच्या वतीने सुरू - आ. अनिल पाटील



 : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात किरकोळ भांडणातून दंगल घडली होती. या दंगलीचे स्वरूप सौम्य होते. परंतु सरकार आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी संचारबंदी लावून अमळनेर शहराची बदनामी करण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. अमळनेर शहरातील निरपराध लोकांना अटक केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झालेली असते. हाणामारी झालेली असते किंवा दंगल मोठ्या स्वरूपाची असते, अशा ठिकाणी संचारबंदी लावण्यात येते. पण अमळनेर शहरातील परिस्थिती वेगळी होती. असे असताना सरकार आणि पोलीस प्रशासनाने संचारबंदी का लावली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवारांशी बोलणे झाले असून अधिवेशनात हा मुद्दा आम्ही मांडू असा इशाराही अनिल पाटलांनी दिला आहे.



BYTE :  अनिल पाटील, राष्ट्रवादी आमदार







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.