मराठा सेवा संघाचे आष्टी तालुका शाखा कार्यकारी मंडळ व वसतिगृह व्यवस्थापकीय मंडळास मंजूरी अध्यक्षपदी तानाजी जंजीरे यांची नियुक्ती

 मराठा सेवा संघाचे आष्टी तालुका शाखा कार्यकारी मंडळ व वसतिगृह व्यवस्थापकीय मंडळास मंजूरी



अध्यक्षपदी तानाजी जंजीरे यांची नियुक्ती

 आष्टी तालुका शाखा कार्यकारी मंडळ व राजमाता जिजाऊ वसतिगृह व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करण्याकरीता पाठविलेल्या प्रस्तावास मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष यांनी मंजुरी प्रदान केली आहे. यामध्ये अध्यक्षपदी शिवश्री तान्हाजी एकनाथराव जंजीरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष पदी शिवश्री लक्ष्मण किसनराव रेडेकर यांची निवड करण्यात आली आहे . मंडळातील इतर पदे पुढील प्रमाणे आहेत . 

शिवश्री भास्कर सिताराम निंबाळकर (सचिव)

 शिवश्री सुरेश रामचंद्रराव पवार (सहसचिव )

 शिवश्री बन्सीधर सोनाजीराव मोरे ( कोषाध्यक्ष )

शिवश्री प्रल्हाद एकनाथराव तळेकर (संघटक )

शिवश्री डॉ. दत्तात्रय वसंतराव नरसाळे ( प्रवक्ता J

शिवश्री डॉ. बाबासाहेब नेहरूराव मुटकुळे (समन्वयक )

शिवश्री अॅड. शरद सूर्यकांतराव कदम (सदस्य )

केंद्रिय कार्यालयीन सचिव (महाराष्ट्र राज्य ) सोमनाथ लकडे यांनी या सर्व पदांना मंजूरी दिल्याचे जाहीर केले आहे . सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुक्यातील विवीध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.