BULDHANA | बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय जन आक्रोश मोर्चा
: भीम जयंती साजरी केल्याने दलित युवक अक्षय भालेराव यांच्या झालेल्या हत्येचा निषेध नोंदविण्यासाठी विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सर्वपक्षीय भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. सदर मोर्चा जयस्तंभ चौकाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरवात करून शहरातील मुख्य मार्गातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला मोर्च्यात या मोर्चात अक्षय भालेराव यांच्या हत्येचा निषेध करीत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी करण्यात आली.या मोर्च्यात बहुसंख्येने मोठ्या संख्येत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी अक्षय भालेराव याची हत्या करणाऱ्या मारेकरांना तात्काळ अटक करावे, यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.


stay connected