तळागाळापर्यंत कॉग्रेस पक्षाची भूमिका पोहचविणार...नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे

 तळागाळापर्यंत कॉग्रेस पक्षाची भूमिका पोहचविणार...नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे



गाव तिथे शाखा स्थापन करणार



केज (प्रतिनिधी) दि १२ रोजी केज येथे शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी पत्रकार परिषद घेतली या वेळी बोलत होते.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या केज तालुका अध्यक्ष पदी निवड केल्या बद्दल आमच्या देशाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी, आमचे नेते आदरणीय राहुल गांधी तसेच आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिक्काअर्जुं खरगे,आमचे राज्याचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले, तसेच आमच्या नेत्या खा रजनीताई पाटील, अशोक दादा पाटील, आदित्य पाटील व आमचे जिल्याचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे व सर्व जेष्ठ मंडळी यांनी माझ्या विस्वास ठेवून तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो..

व माझ्या सारख्या सर्व सामान्य माणसाला व चळवळीतील कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली त्या बद्दल मा आभारी आहे. तसेच मला जी संधी दिली त्याचे सोन केल्याशिवाय राहणार नाही.. तसेच प्रत्येक गावांमध्ये पुन्हा कॉग्रेस पक्षाची बांधनी करून उभारणी देईल. गाव तिथे कॉग्रेस शाखा स्थापन करुन सर्व सामान्य माणसाचे काम करू. व कॉग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम करणार आहे व माझ्या पदाचा जास्तीत जास्त फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले...









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.