आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, आरोग्याची कुंडली आता डिजिटल, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्ड काढून घ्यावे

 आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, आरोग्याची कुंडली आता डिजिटल,
 नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्ड काढून घ्यावे



      - डॉ. नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग

       ABHA कार्ड काढण्यासाठी आशा आपल्या दारी

        आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ( ABHA) महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम, यामार्फत सर्व नागरिकांचे ABHA कार्ड काढण्यात येणार आहेत, कार्डच्या  माध्यमातून आपली सर्व आरोग्य विषयक माहिती आता इथून पुढे ऑनलाईन दिसणार, म्हणजेच इथून पुढे आपल्याला दवाखान्यात जाताना फाईल घेऊन जायची आवश्यकता नाही आपण ज्या दवाखान्यांमध्ये जाऊ तेथे ABHA कार्डचा 14 अंकी नंबर टाकल्यावर आपली पूर्ण माहिती त्या डॉक्टरांना दिसेल आणि अजून पुढील माहिती ते डॉक्टर त्याच्यामध्ये ऍड करू शकतील,

 म्हणजे इथून पुढे आपल्याला दवाखान्याचे फाईल कागद जास्त सांभाळून ठेवण्याची आवश्यकता पडणार नाही कारण सर्वच या कार्डमार्फत ऑनलाईन होणार आहे

       हे कार्ड कोठे काढून भेटणार??

       सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी, उपकेंद्रांच्या ठिकाणी आणि प्रत्येक गावांमध्ये आशा कार्यकर्तेमार्फत हे कार्ड आपणास मोफत मध्ये काढून देण्यात येणार आहे

       गावामधील सर्व नागरिकांनी आपल्या गावातील आशा  मार्फत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ( ABHA) काढून घ्यावे





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.