जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राहुल मोरे यांनी स्वतः रक्तदान करत रक्तदात्यांना केले,रक्तदानासाठी आवाहन.
0Tejwarta News Networkजून १४, २०२३
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राहुल मोरे यांनी स्वतः रक्तदान करत रक्तदात्यांना केले,रक्तदानासाठी आवाहन.
बीड (प्रतिनिधी) - एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन लोकांचा जीव आपण वाचवू शकतो,म्हणून स्वयंस्फूर्तीने सुजाण नागरिकांनी नियमित रक्तदान करत सामाजिक दायित्व दाखवावे,असे रक्तदान दिनानिमित्त स्वतः राहुल मोरे यांनी रक्तदान करून या दिनानिमित्त रक्तदातांना आवाहन केले आहे. 'रक्तदान हे, सर्वात श्रेष्ठदान' समजले जाते.आपण दान केलेले रक्त एखाद्या जखमीला, अपघातग्रस्तांना, गरजवंतांना जीवनदान देण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु काही वेळा रक्ताचा तो तुटवडा भासतो, याचे परिणाम गंभीर होतात, म्हणून सजग नागरिकांनी नियमित रक्तदान करणे महत्त्वाची आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा नेहमी होत असतो. राज्यात अनेक रुग्णालयांमध्ये नियमितपणे महत्त्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात, या शस्त्रक्रियांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते,जर रक्ताचा साठा वाढला नाही तर अशा रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. याचा सर्वांनीच गांभीर्यपूर्वक विचार करून प्रशासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे असुन,विविध सामाजिक संघटना,तरुण मंडळी, सेवाभावी संस्था, रक्तदानासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील कार्य करण्याऱ्या सुजाण नागरिकांनी पुढे येऊन रक्ताचा पुरवठा वाढवण्यास सहकार्य करणे गरजेचे असून या परिस्थितीचे गांभीर्य वेळी च लक्षात घेत राज्यातील सर्व रक्तपेढ्यानी साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.आपल्यामुळे कोणाला तरी मदत होणार आहे, त्याची जाणीव ठेवून 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असून सर्वांनी प्रशासनाने केलेल्या सुरक्षिततेबाबत चे सर्व नियमांचे पालन करून रक्तदान करावे असे आवाहन राहुल मोरे यांनी केले आहे. या रक्तदानाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे साहेब ,प्रा.गोपाळ धांडे, अजय कोल्हे, डॉ. कट्टे मॅडम, डॉ.खरात सर, सह सर्व जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व सर्व टिम उपस्थित होती.
stay connected