पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी गावागावात शिवसेना शाखा स्थापन करा-
===============================
नवनियुक्त जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांचे केज तालुका बैठकीत आवाहन
केज (प्रतिनिधी)
- - शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख माजी मंत्री मा.आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्हाप्रमुख पदी (पुर्व) निवड झाल्यानंतर प्रथमच कैज येथे आज दि.१० जुन २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह केज येथे केज तालुका शिवसेनेची बैठक नवनियुक्त जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या उपस्थित संपन्न झाली..
सदरील बैठकीत जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत साहेब,शिवसेना सचिव खा. विनायक राऊत साहेब, खा. अनिल देसाई साहेब, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब,, उपनेत्या सुषमाताई अंधारे,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर साहेब यांचे विशेष आभार मानले.
त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातून लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सर, जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबूरे यांनीही केलेल्या सहकार्यबद्दल आभार व्यक्त केले.
आज बैठकीत केज तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, वाहतूक सेना पदाधिकार, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांचे आभार मानून येणाऱ्या काळात शिवसेना शाखा प्रत्येक गावात स्थापन करून मा उद्धवजी ठाकरे साहेबांना साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून शिवसेनेचे भगवा वादळ निर्माण करावं असे आवाहन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी केले.
तसेच गेल्या २३ वर्षात शाखा सचिव ते जिल्हाप्रमुख अशा संघर्षमय काळाचा अनुभव पणाला लाऊन केज विधान सभा मतदार संघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून येईपर्यंत शिवसैनिकांनी माझ्या सोबत खंबीरपणे साथ द्यावी असे आवाहन केले यावेळी अनेक पदधिका-याने बैठकीत भावना व्यक्त करीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे वचन दिले.
यावेळी बैठकीला उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी, दिपक बप्पा मोराळे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव, जिल्हा संघटक अभिमान बापु पटाईत, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात,कॉलेजकक्ष जिल्हाप्रमुख किशोर घुले, शहरप्रमुख तात्या रोडे, महिला आघाडीच्या अश्विनी दीदी बडे,राऊत ताई,ढाकणे ताई,तालुका सचिव रामहरी कोल्हे,तालुका संघटक लक्ष्मण गालंडे, उपतालुका प्रमुख सुनील पटाईत, अभि घाटुळ, रोहित कसबे, सुभाष ठोंबरे, पप्पू ढगे, अमोल चौधरी, जहेद शेख, सुधीर जाधव, आत्तम घाडगे,हरीश गित्ते,मधु अंधारे,प्रकाश केदार, रमेश निंगुळे,रवि ठोंबरे, सखाराम वयबसे, राहुल जाधव, ज्योतिकांत काळसकर, प्रदीप काळे, दिलीप जाधव बाळू कसबे, शेळके सर सह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते..



stay connected