व्यापारी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुरेश धस

 व्यापारी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध  : आमदार सुरेश धस

कडा येथे जनसंपर्क अभियान अंतर्गत व्यापारी संमेलनास उस्फूर्त प्रतिसाद





आष्टी : प्रतिनिधी

गावाचा ,शहराचा विकास हा व्यापारी वर्गावरच अवलंबून असतो. ज्या शहराची बाजारपेठ मोठी असते त्या शहराचा विकास झपाट्याने होत असतो. गावामध्ये किंवा शहरांमध्ये जर  व्यापार चांगला चालला तर विकासास चालना मिळत असून आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.

ते कडा येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने जनसंपर्क अभियान अंतर्गत व्यापारी संमेलनात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कड्याचे जयदत्त धस, सरपंच युवराज पाटील, व्यापारी संघाचे अध्यक्ष रतिलाल कटारिया,उद्योजक रमेश गुगळे, पांडुरंग चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,नागेश कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना धस म्हणाले की कडा कृषी उत्पन्न बाजार समिती ची गरुड झेप संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे.येथील कांदा मार्केटने आष्टी मतदार संघाला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे. याच बाजार समितीतून परदेशातही कांदा निर्यात होत असल्याने व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजार समिती आवारातील रस्ते, शेतकरी भवन आधी प्रश्न लवकरच सुटणार आहेत. तसेच कडा शहरांमध्ये 50 लाख रुपये किमतीचे दोन फिरते शौचालय लवकरच अस्तित्वात येणार आहेत. यावेळी काही सराफा व्यापाऱ्यांनी पोलीस विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार करताच आमदार धस यांनी सांगितले की, याविषयी पुढील आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भेटून सराफ व्यापाऱ्यांची व्यथा मांडणार आहे. सध्या नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत देशात विकासाचा रथ मोठ्या प्रमाणात धावत आहे जीएसटी संकलनावर अगोदर विरोधकांनी टीका केली होती मात्र आता दर महिन्याला दोन लाख कोटी जीएसटी येत असल्याने विकासास निधी कुठेही कमी पडत नाही.हीच विकासाची गंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली असून येत्या काही दिवसात  तालुक्यातील जुन्या विजेच्या तारा साठी 90 कोटी रुपयांचा निधी येणार आहे. त्यासाठी ऊर्जामंत्री व माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना भेटून मतदारसंघातील हा प्रश्न मार्गी लावणार आहे.

सध्या दुधाचे दर कमी झाले असून दुग्ध व्यवसायावरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बऱ्यापैकी अवलंबून असल्याने दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दोन दिवसापूर्वीच शेतकऱ्यांना प्रति पाच  रुपये लिटर अनुदान देण्याची मागणी केली आहे याचा निर्णय येत्या काही दिवसात होणार असून दूध उत्पादकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. आयुष्यमान भारत या योजनेतून लाखो लोकांना दवाखान्याच्या खर्चातून मुक्ती मिळत असल्याने ही योजना संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी करून दाखवली आहे.यावेळी रमजान तांबोळी,रतीलाल कटारिया,रमेश गुगळे,पांडुरंग चौधरी,

सुमित भंडारी,दिलीप पटवा,हेमंत पोखरणा,

लक्ष्मण बांदल,जयंत खंदारे,वेदपाठक नाना आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल ढोबळे यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय मेहेर रामनगर संजय ढोबळे,योगेश भंडारी,अशोक पवार,गोरख कर्डीले,गोकुलशेठ मेहेर,दत्ता होळकर, विक्रम नरवडे,सचिन घावटे,बिपीन भंडारी,मधु सायंबर,उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, हनुमंत गळगटे, बबलू तांबोळी,राजू खलाटे,समद शेख,गोकुळ कर्डीले,सुभाष ढोबळे,राम ससाणे,संपत कर्डीले,अमित पटवा, शैलेश गांधी,बा ल पवार,संतोष भंडारी यांच्यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.