केज तालुक्यातील दिपेवडगाव येथे उद्योजकता विकास’ कार्यशाळा संपन्न

 केज तालुक्यातील दिपेवडगाव येथे उद्योजकता विकास कार्यशाळा संपन्न



 केज (प्रतिनिधी) 

सेवा इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांकरिता एक दिवसीय व्यावसाय उभारणी संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केज तालुक्यातील दिपेवडगाव येथे करण्यात आले होते.


या प्रशिक्षणात महिलांना व्यवसायाची कल्पना कशी आखावी, व्यवसायासाठी कोणकोणते कागतपत्रे लागतात, तसेच व्यवसाय उभारणी साठी शासनाच्या योजना या संदर्भात महिलांना या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

या मुळे महिलांच्या आत्मविश्वासामध्ये आणखी वृद्धी होऊन त्यांना व्यवसायाच्या नावीन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणता येण्यासंदर्भात माहिती  मिळाली, तसेच या कार्यशाळेत आर्थिक व्यवस्थापन, व्यवसायाची कायदेशीर बाजू आणि विविध बँका व स्टार्टअप, कंपन्यांची या संदर्भातील भूमिका, या मुख्य विषयांवर कार्यशाळेत भर देण्यात आला. व घरगुती खाद्यपदार्थ बनवणे , दुग्धव्यवसाय, रिटेल, सोलर पॅनल अशा विविध क्षेत्रांतील व्यवसायांच्या संकल्पनांविषयी या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळे करिता उपस्थित महिलांना प्रशिक्षक देआसरा फाउंडेशन चे श्री प्रकाश आगाशे सर व कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाला उपस्थित उमेद अभियानाच्या कांबळे मॅडम,  

सेवा इंटरनॅशनल चे वैजनाथ इंगोले, ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या शीतल दादासाहेब गायकवाड, अशोक हातागळे, गावचे सरपंच दीपक गुळभीले गावातील महिला उपस्थित होत्या.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.