आष्टीत शहरात भिषण अपघात,एक जण जागीच ठार.!

 आष्टीत शहरात भिषण अपघात,एक जण जागीच ठार.!

----------------




आष्टी/प्रतिनिधी 

आष्टी शहरातील जामखेड - नगर रोडवर असलेल्या आंबेडकर चौकात आज दि. १० रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास भीषण आपघात झाला. या अपघातात मोटार सायकल स्वार ट्रक खाली येऊन जागीच ठार झाला. प्रथमदर्शींच्या म्हणण्यानुसार ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. 


याबाबत आधिक माहिती अशी की, सिमेंट वाहतुक करणारा ट्रक ( एमएच 16  सीडी 2466) हा जामखेड कडे चालला होता. भरधाव ट्रक आष्टी शहरातील आंबेडकर चौकात आल्यानंतर समोरून मोटारसायकल ( एमएच 23 एएम 9719)  वरून आलेल्या रामकिसन काकडे, रा शिदेवाडी ( वय -66 वर्षे ) यांना या ट्रक ने चिरडले. यावेळी काकडे यांच्या डोक्यावरून ट्रकचे पाठीमागचे चाक गेल्याचे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले तर मृतदेह सरकारी दवाखान्यात  नेण्यासाठी अशोक पोकळे, सरपंच पंडीत पोकळे सह इतरांनी सहकार्य केले.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.