कशा माणसांना जपावे?
आवड ज्यांना आपली
अशांसोबत सदा रमावे...
सुख-दु:ख वाटूनी घेती
अशा माणसांना जपावे...
हे मन जिथे हलके होती
अशांजवळ व्यक्त व्हावे...
अबोल भाव जे वाचती
अशा माणसांना जपावे...
डोळ्यात ज्यांच्या आदर
तयांची कदर करावे...
आधार बणूनी उभे राहती
अशा माणसांना जपावे...
जाणीव ज्यांना आपली
भेटीस उत्सुक असावे...
निष्पाप स्पर्श करती
अशा माणसांना जपावे...
आनंदी चेहरा पाहण्यास
नेहमी नेहमी तया भेटावे...
कुशीत ज्यांच्या स्वर्गसुख लाभती
अशा माणसांना जपावे...

stay connected