गांधी कॉलेज कडा येथील मुक्त विद्यापीठाच्या अश्विनीची पोलीस दलात गरुड भरारी

 गांधी कॉलेज कडा येथील मुक्त विद्यापीठाच्या अश्विनीची पोलीस दलात गरुड भरारी

--------------------


आष्टी/प्रतिनिधी 

सध्या भारतामध्ये सुशिक्षित बेरोजगाराची संख्या वाढत असताना रोजगाराच्या संधी वाढण्याच्या प्रमाणात थोडी मागणी पुरवठा मध्ये तफावत निर्माण झाली आहे.यामुळे मोजक्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असतानाच प्रचंड स्पर्धेच्या युगात परिवाराच्या भक्कम साथीने व स्वतः प्रचंड कष्टाने अश्विनीने पोलीस दलात संघर्षातून मोठे यश संपादन केले आहे.


गांधी महाविद्यालय कडा येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रातील बी.लिब ची विद्यार्थीनी अश्विनी पवार हिची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे. ती कुसळूंब  ता पाटोदा येथील गावची आहे  प्रतिकुल परिस्थितीवर मात करून हे यश संपादन करणाऱ्या अश्विनीची शैक्षणिक वाटचाल सुरुवातीपासूनच नैत्रदीपक राहिली आहे.ग्रामीण भागातील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील तरुणीने मिळवलेले हे यश नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आमच्या महाविद्यालयास याचा अभिमान आहे. यानिमित्ताने महाविद्यालयातील  प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, केंद्र संयोजक प्रोफेसर डॉ.अशोक कोरडे पाटील, डॉ.अरुणा  कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक जयश्री नागरगोजे मॅडम,प्राध्यापक किशोर दळवे सर व खंदारे सर यांनी विद्यार्थीनीचा सत्कार केला.

आपल्या पदाच्या माध्यमातून देशाची उत्तम सेवा बजावण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व प्राध्यापकांनी अश्विनीला भरभरून शुभेच्छा दिल्या.








Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.