प्रगतशिल शेतकरी तथा कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांचा कांदा व लसूण उत्पादन आणि मूल्यसाखळी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल सन्मान

 प्रगतशिल शेतकरी तथा कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांचा कांदा व लसूण उत्पादन आणि मूल्यसाखळी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल सन्मान




आष्टी ( प्रतिनिधी ) - भा. कृ . अनु . प . कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे यांच्या मार्फत आष्टी तालुक्यातील प्रगतशिल शेतकरी तथा कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांना कांदा व लसूण उत्पादन आणि मूल्यसाखळी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले .



कांदा आणि लसूण संशोधन केंद्र भारत सरकार Gov of India  (NRC ) राजगुरूनगर पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवी 25 व्या वर्धापन दिना निमीत्त महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते . पैकी श्री . बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे यांनी सोना 40 या कांदा वानाचे संशोधन करून बियाणे निर्मीत केलेले आहे . त्याचा उपयोग शेतकरी बांधवांना होत आहे . गेली 20 वर्षे अथक परिश्रम व संशोधन करून पिसोरे यांनी हे वाण तयार केले आहे . हे उत्तम प्रतीचे वाण शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले आहे . त्याकरिता NRC मार्फत त्यांचा यथासांग सन्मान करण्यात आला . यावेळी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तसेच व्यासपिठावरील NRC चे संचालक डॉ . महाजन , कोकण विद्यापिठाचे कुलगुरू तथा 14 वर्षे संचालक म्हणून NRC चे गाढे अभ्यासक डॉ. किसनरावजी लवांडे साहेब , डॉ. के . स्वामी रेड्डी , डॉ .रत्ना मॅडम , डॉ काळे , डॉ शामसजन , डॉ . गुप्ता साहेब , डॉ . गवळी साहेब आदी शास्त्रज्ञ उपस्थित होते . यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षप्रेमी बाबासाहेब पिसोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.