Pm Modi यांनी जागतिक पातळीवर नेतृत्व सिद्ध करून...
भारत देशाची मान जगामध्ये उंचावली आहे... MLA Suresh Dhas यांचे प्रतिपादन...
आष्टी (प्रतिनिधी)भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीतून... जनतेप्रती असलेल्या सततच्या चिंतनातून आणि अखंड परिश्रमातून... जागतिक पातळीवरील आपले नेतृत्व सिद्ध केले असून...
संपूर्ण जगामध्ये भारत देशाची मान उंचावण्याचे काम केले आहे... देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडी अडचणी सोडवण्याचे महान कार्य पंतप्रधान मोदी यांनी केले असल्यामुळे... आगामी लोकसभा निवडणुकी मध्येही भारतीय जनता पार्टीचेच सरकार येणार आहे...
असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले...
आष्टी येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीमध्ये अनेक उपक्रम आयोजित केले असून..
या कालावधीमध्ये.. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील योजनांबाबत माहिती पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.. त्या अनुषंगाने.. भारतीय जनता पार्टीचे.. बूथ प्रमुख, बुथ समिती, शक्ती केंद्रप्रमुख, विस्तारक, गणप्रमुख, गटप्रमुख, यांच्यासह.. प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते....
ते पुढे म्हणाले, सेवा सुरक्षा आणि गरीब कल्याण हेच भारतीय जनता पार्टीचे यशस्वीतेचे सूत्र असून..
सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा संपूर्ण बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टीची केंद्र शासनामध्ये सत्ता प्रस्थापित झाली..
त्या काळातील उत्तम कामगिरीमुळे सन २०१९ मध्ये भारतातील जनतेने ३०३ लोकसभा खासदार निवडून देऊन.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची पावती दिली...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०२३ या नऊ वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांच्या गरजांची पूर्तता होत असताना दैनंदिन जीवनातील व्यवहार सोपे व्हावेत...
सरकारी योजनांचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांपर्यंत कोणत्याही मध्यस्था शिवाय लाभार्थ्यापर्यंत.. पोहोचण्यासाठी..
थेट बँक खात्यावर अर्थसाह्य पोहोचवण्याचे काम केले...
त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वेगवेगळ्या योजनांचे अनुदान, पंतप्रधान आवास योजने अनुदान, शौचालय यांचे अनुदान, यांचा समावेश आहे...
यापूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागत असत...
ते आता बंद झाले आहे.. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी किसान सन्मान निधी योजना राबवून त्यामध्ये केंद्र शासनाकडून ६००० रू. प्रतिवर्षी मंजूर करण्यात येत असून त्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सरकारने आणखी ६००० रू. रुपयांची वाढ केल्याने आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये प्रति वर्षी मिळणार आहेत..
सन २०१४ पर्यंत केवळ ४० % लोकांमध्ये स्वच्छतागृह होती..
आता जवळपास ७५ % लोकांकडे स्वच्छतागृह बांधकाम करण्यात आलेले आहे ..त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत झालेली आहे ...
गोरगरीब जनतेसाठी आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत ५ लाख रुपये पर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत करण्यात येत असून या योजनेखाली.. २२कोटी लोकांची नाव नोंदणी करण्यात आलेली असून ४ कोटी रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे..
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ... ३ कोटी लोकांचे घराचे बांधकाम करण्यात आलेले आहे..
१२ कोटी लोकांना.." हर घर जल " योजनेअंतर्गत नळ योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.. तसेच पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेद्वारे ३० कोटी लोकांना विमा संरक्षण देण्यात आले असून.. सौभाग्य योजनेद्वारे.. ३ कोटी लोकांपर्यंत वीज जोडणी करण्यात आलेली आहे ..२५ लाख दिव्यांग लोकांना व्हीलचेअर्स देऊन त्यांना मदत करण्यात आली असून.." उज्वला " या योजनेअंतर्गत २० कोटी महिलांना घरगुती गॅसचे वाटप करण्यात आलेले आहे...या शिवाय..
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळामध्ये जगामध्ये लस उपलब्ध नसताना भारतातील वैद्यकीय उद्योजकांकडून लस निर्माण करण्यात आली आणि जगातील पाच प्रगत राष्ट्रांमध्ये भारताने उच्च प्रतीचे काम या लसीकरणामुळे झाले आहे.. भारत देशाच्या संरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान मोदींनी केलेले काम म्हणजे शेजारच्या राष्ट्राकडून..सतत होणारा दहशतवादाचा कायमस्वरूपी बिमोड करण्यात आला असून.. शेजारी राष्ट्रांना तुमच्या घरात घुसून मारू असा संदेश देत.. सन २०१६ आणि २०१९ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करून भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रदर्शन घडवले आहे... भारत देशाची अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे.. असा अपप्रचार विरोधी पक्षाकडून केला जात आहे.. मात्र हा अपप्रचारच असून ..
भारत देशाची अर्थव्यवस्था सध्या ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार.. सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची झालेली असून भारताचे सकल वार्षिक उत्पन्न ८५७.७ अब्ज डॉलर्स एवढी आहे..
कोविड च्या अगोदर तीन वर्षे आणि कोविड नंतरच्या तीन वर्षाच्या जीडीपीचा दर लक्षात घेता जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांच्या या यादीमध्ये भारत देश हा दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असे दिसून येत आहे...असे सांगत..
मध्यंतरी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला हार पत्करावी लागली याची कारणे अनेक आहेत त्यावर विचार मंथन सुरू आहे परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी.. राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला होता.. तरीदेखील..
लोकसभा निवडणुकीमध्ये या तीनही राज्यातील सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत..
हे देखील विरोधकांनी लक्षात घ्यावे..
असे सांगून आ.सुरेश धस पुढे म्हणाले की,
भारतीय जनता पार्टीने सुरू केलेल्या सरल ॲप मधील केंद्र शासनाच्या योजना आणि त्या संबंधाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आष्टी तालुक्यातील ४४१ बूथ मधील किमान ६० मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम केल्यामुळे आष्टी तालुक्याचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक आलेला असून लवकरच...१५० मतदारांपर्यंत जाऊन..क्रमांक एक पर्यंत पोहोचण्याचे काम आपल्याला करावे लागेल असे त् सांगत...भा.ज.पा. सोशल मीडिया विभागाने उल्लेखनीय कार्य केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.. दि.२१ जून रोजी जागतिक योग दिना निमित्त प्रत्येक बुथ वर जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्र येऊन योग दिन साजरा करावा त्यानंतर.. दि.२३ जून रोजी भारत देशासाठी बलिदान दिलेले तत्कालीन जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी असल्याने... गावोगावी कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करावे..
३० जून रोजी भा.ज पा. राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई मुंडे यांचे समवेत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची..
टिफिन डबा पार्टी आयोजित करण्यात आलेली आहे.. असे सांगून आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे झालेली असून..
पाटोदा तालुक्यातील ब्राह्मण वाडी, बेन्सुर ते घाटेवाडी- रोहतवाडी, विघनवाडी ते श्रीपत वाडी मातोरी ते भालकेश्वर.. येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ते होणार असून..
आष्टी तालुक्यातील..
आष्टा ते शिंदे वस्ती, लोणी ते धानोरा - पाथर्डी हद्दीपर्यंत ५०० कोटी रु. किमतीच्या एच ए एम (हम) या योजनेतून रस्ता काम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले...
मागील महाविकास आघाडीच्या काळामध्ये केवळ घोटाळे आणि घोटाळे होते.. पेपर घोटाळा, भरती घोटाळा, असे अनेक घोटाळे झाले..तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून.. माझे कुटुंब माझी जबाबदारी..
या योजनेत केवळ मी आणि माझा परिवार अशीच प्रगती केल्याने त्यांना पायउतार होण्याची पाळी आली ..
कोविड काळात या सरकारने काहीही केले नाही त्या काळात आम्ही हे सरकार हरवलेले आहे अशी फिर्याद चकलंबा पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेलो होतो.. असे सांगून .त्यांनी आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित फेरफार यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी.. शेतकऱ्यांच्या बांध रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी... तसेच शेतकऱ्यांचे मोजणी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी... जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले...
यावेळी श्री तात्यासाहेब हुले, श्री.रामराव खेडकर, श्री सुरेश उगलमुगले,श्री. ज्ञानेश्वर माऊली जरांगे,श्री. महेंद्र गर्जे, डॉ.पांडुरंग चौधरी, श्री.रमेश ढगे यांची समायोजित भाषणे झाली.. तर या सभेला.. आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,तालुकाध्यक्ष भागवत येवले,नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर,नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,सभापती रमजान तांबोळी, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,आदिनाथ सानप, प्रकाश खेडकर, किरण शिंदे,कल्याण तांबे, आदम सय्यद,पांडुरंग चौधरी,कल्याण पोकळे,किरण बांगर,जिया बेग,गणेश शिंदे,राजू शिंदे,अनिल ढोबळे,अनिल काथवटे,अशोक सुपेकर,किशोर झरेकर, शरीफ शेख,सुरेश वारंगुळे आदीसह आष्टी,पाटोदा शिरूर कासार मतदारसंघातील बूथ प्रमुख,विस्तारक,शक्तिकेंद्र प्रमुख,पन्ना प्रमुख,बूथ समिती सदस्य सह भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.







stay connected