ऊस तोडणी सारखे कष्टप्रद काम करण्याऐवजी रोहयोची कामे करावीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचे प्रतिपादन
********************************
" आपत्ती ही इष्टापत्ती समजावी "
-----आ. सुरेश धस
*****************************
****************************
आष्टी (प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी जावे लागते ही अत्यंत कष्टप्रद बाब असून ऊस तोडणी साठी गेलेल्या महिलांना अत्यंत वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्यामुळे..मजूरांनी महिलांना घरी ठेवून गावाकडील शेतीवर भर द्यावा.. आणि शेती नसेल तर रोजगार हमी योजना ही अत्यंत उपयुक्त असून नियमानुसार कामे करून ऊस तोडणी पेक्षा जास्त मजुरी पदरात पाडून घ्यावी असा बहुमोल सल्ला बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी दिला...
आष्टी येथील
" शासन आपल्या दारी " या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या ..
त्यापुढे म्हणाल्या..
शेतकरी, शेतमजुरांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे मुलांच्या भवितव्यासाठी प्रयत्न करावेत..
शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन संपन्न करावे..
बीड जिल्ह्यातील समस्या बनलेली बालविवाह प्रकरणे अत्यंत अयोग्य असून अल्पवयीन मुलींच्या आरोग्यावर विपरीत करणारे ही बाब असून..
या अल्पवयीन मुलींच्या जीवन आरोग्यदायी होण्यासाठी वयो मर्यादेचे बंधन महत्त्वाचे असून शासन याबाबत अत्यंत कठोर असून कुठलाही बालविवाह सहन केला जाणार नाही...
या संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला..
शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना अर्थसाह्य मिळण्यासाठी त्यांनी केवायसी तसेच आधार लिंक केल्याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अशक्य आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आधार लिंक आणि केवायसी करून घ्यावी असेही त्यांनी शेवटी सांगितले..
" आपत्ती ही इष्टापत्ती समजावी "
आ. सुरेश धस
मान्सून चा पाऊस लांबल्यामुळे ही आपत्ती जरी वाटत असली तरी..
या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे..
कारण या लांबलेल्या पावसामुळे प्रकल्पांमधील गाळ उपसा करण्या संबंधी विचार होऊ शकतो ..
या प्रकल्पातील गाळ उपसा झाल्यास या प्रकल्पातील पाणीसाठा वाढून शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात टाकल्यास जमिनीचा पोत वाढतो आणि उत्पन्नात भर पडत असल्यामुळे या लांबलेल्या पावसाच्या आपत्तीची इष्टापत्ती मध्ये रूपांतर करावे असे सांगून त्यांनी जिल्हाधिकारी यांना उद्देशून सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोजणीची प्रकरणे प्रलंबित असून ही सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत... तसेच सर्व तालुक्यांमध्ये..महसूल मंडळस्थानी शिबिरे आयोजित करून ..
तेथील विधवा महिला, दिव्यांग, आणि निराधार नागरिकांचे श्रावण बाळ योजनांचे अर्ज स्वीकारावेत कारण या गोरगरीब जनतेला तहसील कार्यालयांमध्ये अनेक हेलपाटे घालावे लागतात आणि कागदपत्रांसाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.. त्यामुळे शासनाने मंडळ स्थानी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले..
बीड जिल्हा पोलीस प्रमुखांनी बनावट दारू निर्मितीची अड्डे उध्वस्त करावेत पावडरची दारू निर्मितीची अड्डे खेडोपाडी निर्माण झालेले आहेत पोलीस विभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्यामुळे अनेक युवकांना या व्यसनामुळे आपले प्राण गमवावे लागलेले आहेत त्यामुळे पोलीस विभागातील या करणे तात्काळ कार्यवाही करण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आष्टीतालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 466 शाळाखोल्या आणि बालकांसाठी असलेल्या 287 अंगणवाडी खोल्या नसल्यामुळे बालकांच्या विकास आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये अडचणी निर्माण होत असल्यामुळे याप्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
‘शासन आपल्या दारी’ याउपक्रमाचे यशस्वी आयोजन.!
भाजप-शिवसेना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणारा 'शासन आपल्या दारी' या लोकोपयोगी महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आज आष्टी व पाटोदा तालुका प्रशासनाच्या मदतीने लक्ष्मी लॉन्स आष्टी येथे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे थांबवून एकाच छताखाली विविध सरकारी योजनांचे लाभ आणि दाखले उपलब्ध करून देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. भाजप- शिवसेना युती सरकार हे जनतेचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून शासकीय योजना जनतेच्या दारी पोहचवण्यात मोठे यश येत आहेत.
या कार्यक्रमात पंचायत समितीच्या उमेद योजनेच्या लाभार्थ्यांना चेक वाटप, बचत गटांना कर्जाचे वितरण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना व मोफत पाठ्यपुस्तक वाटप, ऊसतोड कामगार ओळख पत्र, दिव्यांग लाभ वाटप, आरोग्य विभागाकडून घरपोच कच्चे धान्य आहार वाटप, बेबी केअर किट वाटप, माझी कन्या भाग्यश्री, सरकारी व खाजगी रुग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी आतुष्य मान भारत योजना, MREGS अंतर्गत जलसिंचन विहिरी, शेततलाव, विहीर पुनर्भरण, रेशीम योजना, घरकुलासाठी रमाई आवास (शहरी/ग्रामीण) , शबरी आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजना, कृषी विभागाच्या माध्यमातुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातग्रस्त कुटुंबांना मोफत बियाणे वाटप, पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत बीजप्रक्रिया ड्रम अनुदान चेक वाटप, दुधाळ जनावरे वाटप, शेळी गट विशेषघटक योजना, महसूल विभागाच्या अंतर्गत येणारे उत्पन्न, Ews,रहिवास, जात, नॉन क्रिमिलेअर आदि प्रमाणपत्र तसेच मतदार ओळखपत्र, भूमी अभिलेख सनद, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, राज्य निवृत्ती वेतन, शिधापत्रिका वाटप, नैसर्गिक आपत्ती चेकवाटप, वन विभागाच्या अंतर्गत वन्य प्राण्यांपासून झालेल्या मनुष्यहानी आणि पीक हानी, कन्या वन समृद्धी योजना, बँकेच्या अखत्यारीत येणाऱ्या पीक कर्ज, PMJJY आणि PMSDY, बचत गट अशा विविध योजनांचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना योजनांची योग्य माहिती, फायदे तसेच प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजली.
शासन आपल्या दारी' हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. आता शासन लोकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. या उपक्रमाअंतर्गत उपस्थित सर्व नागरिकांना शासनाच्या लाभदायी योजनांबद्दल मार्गदर्शन करून, शासकीय दाखले देण्यात आले. या उपक्रमाला आष्टी आणि पाटोद्यातील नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.
यावेळी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम, बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार (ता. आष्टी) राजेंद्र शिंदे, तहसीलदार (ता.पाटोदा) संतोष बन, गटविकास अधिकारी (आष्टी) सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी (पाटोदा) सुमित जाधव, नायब तहसिलदार (आष्टी) बाळदत्त मोरे, नायब तहसिलदार (पाटोदा) इंद्रजित गराड, तालुका कृषी अधिकारी गोरक तरटे, सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे आदी मान्यवर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आलेल्या सर्व लाभार्थ्याच भोजनाची व्यवस्था आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली.







stay connected