नांदेड या ठिकाणी घडलेल्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या - भिम आर्मी

 नांदेड या ठिकाणी घडलेल्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या - भिम आर्मी





नांदेड जिल्ह्यातील बोंडार ( हवेली ) या ठिकाणी माणुष्कीला काळीमा फासणारी घटना घडली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून अक्षय भालेराव या बौध्द तरूणाची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज रोजी भिम आर्मी भारत एकता मिशन च्या वतीने महात्मा गांधी चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये पिडीत कुटूंबाना 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी पिडीत कुटूंबाना पोलीस संरक्षण देण्यात यावं पिडीत कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत घ्यावे बोंढार या गावातील सरपंच,पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, व या प्रकरणामध्ये जे आरोपींना पाठीशी घालणारे राजकीय नेते आहेत त्यांना सुध्दा या प्रकरणात सह आरोपी करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री गृहमंत्री नांदेड चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला यावेळी भिम आर्मी भारत एकता मिशन चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील सहकारी बांधव उपस्थि होते या आंदोलनातून सर्व आंबेडकरी जनतेला व सर्व पक्षीय संघटनेला चलो नांदेड चा नारा देण्यात आला लवकरच सर्व पक्ष संघटना नांदेड ला धडकणार असल्याचे भिम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे यांनी सांगितले.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.