DHULE | अर्धा कोटीचा गुटखा धुळे पोलिसांनी केला जप्त, महामार्गावर सापळा रचून ट्रक चालकाला घेतले ताब्यात

 DHULE | अर्धा कोटीचा गुटखा धुळे पोलिसांनी केला जप्त, महामार्गावर सापळा रचून ट्रक चालकाला घेतले ताब्यात 



 - इंदौरकडून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर ट्रकमधून पोलिसांनी २९ लाख रूपये किंमतीचा गुटखा व १५ लाख रुपयांचा मालट्रक असा सुमारे ४३ लाख ६७ हजार ११८ रूपये किंमतचा मुद्देमाल हस्तगत केला. ६ जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या नरडाणा (ता. शिंदखेडा) शिवारातील हॉटेल अन्नपूर्णा जवळ ही कारवाई झाली. याप्रकरणी ट्रक चालकासह अन्य एका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 


यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात गुटखा विक्रीला प्रतिबंध असताना इंदौरहून पुण्याकडे गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. विक्री व तस्करीच्या उद्देशाने होत असलेल्या या बेकायदेशीर वाहतूकीला अडथळा घालण्यासाठी पोलिसांनी महामार्गावर सापळा रचला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली एमएच १८ / बीजी- ३३०२ या क्रमांकाचा आयशर ट्रक थांबविला आणि तपासणी केली. यावेळी ट्रक चालकाने आपले नाव सदाशिव रामचंद्र राठोड (वय ३५) रा. महुगाव (ता. महु जि. इंदौर) असे तर त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने आपले नाव सिकंदर कैलास सोनगरा हरसोला (ता. महु जि. इंदौर) असे असल्याचे सांगितले. ट्रकमधील मालाची विचारपूस केल्या नंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.


पोलीसांनी खात्री केली असता ट्रकमध्ये आरएमडी हा ४ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा पानमसाला तर २ लाख ८८ हजार रूपये किंमतीचा एमसेंटेड तंबाखू गोल्ड, ६ लाख १५ हजार ६०० रूपये किंमतीचा रजनीगंधा पान मसाला, १ लाख ५५ हजार ५२० रुपये किंमतीचा तुलसी रॉयल लालपाणी जर्दा, २ लाख ६१ हजार ३६० रुपये किंमतीचा विमल पान मसाला २९ हजार ४०० रूपये किंमतीचा व्ही. १ तंबाखू १३ हजार ५०० रूपयांची डबल ब्लॅक १८ प्रीमियम तंबाखू  १ लाख ४४ रुपये किमतीचा राजश्री पान मसाला, ३८ हजार ८०५ रूपये किंमतीची चैनीखैनी पाऊच, ८ लाख ८८ हजार ८५८ रुपये किंमतीचा परचुरन माल व १५ लाख रूपये किंमतीचा आयशर ट्रक असा मुद्देमाल पोलीसांच्या हाती लागला आहे.


ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, मयुर पाटील, तुषार पारधी, योगेश साळवे यांच्या पथकाने केली आहे.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.