आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डोंगरगण येथील तिघांवर गुन्हा दाखल..!
------------------
गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले अद्याप आरोपी अटक नाहीत...
आष्टी/ प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील रहिवासी असणारे मयत गंगाराम जबाजी घोडके वय वर्ष ४५ व त्याच गावात राहणारे छायाबाई महादेव कांबळे,बाळु महादेव कांबळे व दिपक शिवराम कांबळे सर्व राहणार डोंगरगण यांचे विरोधात मयत गंगाराम घोडके यांची मुलगी स्नेहा गणेश पवार यांनी पोलिस स्टेशन अंभोरा येथे गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत त्यांनी असे म्हटले की,वरील सर्व आरोपी माझ्या वडीलांकडे आले व म्हणाले तु दारू पिऊन माझ्या भावजईच्या अंथरुणात पडला व गळ्यातील दागिने चोरण्याचा पण
प्रयत्न केला.असे म्हणून त्यांनी माझ्या वडीलांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी व चापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.तेवढ्यात आमच्या शेजारीच राहणारे रावसाहेब शिवराम कांबळे यांनी भांडणे सोडवासोडव केली.व ते भांडण तेथेच मिटवले.
परंतु दिनांक २३ मे रोजी छायाबाई महादेव कांबळे यांनी माझ्या वडीलांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात माझ्या अंगावर हात टाकणे व दागिने चोरण्याचा प्रयत्न करणे अशा आशयाची तक्रार दाखल केली.तेव्हापासून माझे वडील घाबरले.त्यांनी जेवण करणे सुद्धा सोडून दिले. घरातल्या व्यक्तींशी बोलणे सुद्धा टाळु लागले.त्यांच्यावर छायाबाई महादेव कांबळे यांनी केस केली आहे असे त्यांना समजताच त्यांनी २४ मे रोजी सकाळी आमच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
माझ्या वडीलांवर खोटी केस केली म्हणुनच माझे वडीलांनी गळफास घेतला अशा प्रकारची फिर्याद मयत गंगाराम घोडके यांची मुलगी स्नेहा गणेश पवार यांनी दिली आहे.
अंभोरा पोलिस ठाण्यात स्नेहा गणेश पवार यांच्या फिर्यादीवरून दिनांक २ जून रोजी छायाबाई महादेव कांबळे,बाळु महादेव कांबळे व दिपक शिवराम कांबळे यांच्या विरोधात भादवी कलम ३०६,३२३,५०४,५०६ ,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास आदीनाथ भडके हे करत आहेत.
तपासी अधिकारी आदीनाथ भडके यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले तपास चालु आहे.
उर्वरित साक्षीदारांचा जवाब घेत आहोत.त्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल.अशी माहीती भडके यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे.


stay connected