खडकत येथे मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील खडकत येथे मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या करण्यात येत असून चार ते पाच ठिकाणी हे कत्तलखाने चालू असल्याचे गावकऱ्यांनी कळवल्यानंतर दिनांक २२ जून २०२३ रोजी सायंकाळी ४४.०० वाजता आष्टी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस हवालदार अशोक शिंदे, पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलीस शिपाई बब्रुवाहन वाणी, चालक हवालदार उदावंत यांनी खडकत शिवारातील अतिक मुनीर कुरेशी यांची शेती गट क्रमांक ३७० या शेतामध्ये तेथे विटाचे बांधकाम असलेल्या बंदिस्त कंपाऊंडच्या आत मध्ये जनावरांची कत्तल करून अनेक जनावरांचे मुंडके, पाय असे अवयव आढळून आले या
पथकाने खडकत येथील पशुधन विकास अधिकारी संदीप गायकवाड यांना पाचारण करून जनावरांच्या मिळालेल्या अवयवातून न्यायवैद्यक परीक्षणासाठी नमुने गोळा केले हे अवयव सुमारे १७२ जनावरांचे आहेत असे त्यांनी सांगितले या ठिकाणी विटांचे बांधकाम असलेल्या बंदिस्त जागेमध्ये जनावरांची कत्तल केली असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून या कत्तलखान्यांमुळे खडकत गावातील अनेक नागरिक त्रस्त झालेले आहेत आष्टी पोलीस स्टेशन येथे अतिक मनेर कुरेशी रा. खडकत ता. आष्टी याच्याविरुद्ध जनावरांची कत्तल करून पुरावा नष्ट करून जनावरांचे अवयव जवळ बाळगले वरून अतिक मुनीर कुरेशी याच्या विरुद्ध भा.द.वि. ४२८,२०१ सह कलम ५, ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


stay connected