रुटी-इमनगाव प्रकल्पातील विना मूल्य गाळ उपसा सुरू..
***************************
आ.सुरेश धस यांच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल...
**************************
शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचे आ.सुरेश धस यांच्याकडून आवाहन.
**************************
****************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील रुटी-इमनगाव प्रकल्पातील गाळ उपसा योजनेस प्रारंभ झाला असून "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमात आ.सुरेश धस यांनी बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांच्याकडे दि.२० जून रोजी मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शुक्रवार दि.२३ जून रोजी आष्टी नगरपंचायत नगराध्यक्ष,उपनागराध्यक्ष,नगरसेवक,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या हस्ते विनामूल्य गाळ उपसा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे..आष्टी तालुक्यातील व परिसरातील शेतक-यांनी या माध्यमातून शेतीसाठी विनामूल्य गाळ घेऊन जाण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
यावर्षी पाऊस लांबणीवर पडला असून आष्टी तालुक्यातील मोठ्या प्रकल्पातील गाळ उपसा केल्यावर मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा येणाऱ्या पावसाने होईल.साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेऊन आ.सुरेश धस यांनी धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी तालुक्यातील धरणांमधील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार होतील अशी मागणी बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांच्याकडे त्या आष्टी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आल्या असता केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पोकलेन उपलब्ध करून देत विनामूल्य दिले असून फक्त शेतकऱ्यांना शेतात घेऊन जाण्यासाठीचा वाहतूक खर्च येणार आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी विनामूल्य गाळ घेऊन जात जास्तीत जास्त गाळयुक्त शिवार करावेत असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, नगरसेवक जिया बेग,सुनील रेडेकर,सुरेश वारंगुळे,किशोर झरेकर,शरीफ शेख,अक्षय धोंडे,पत्रकार प्रविण पोकळे,सतीश निंबाळकर, राम योगे,योगेश जगदाळे आदी या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.





stay connected