Ashti तालुक्यात Lodge बनले वेश्या व्यवसायांचे अड्डे

Ashti तालुक्यात Lodge बनले वेश्या व्यवसायांचे अड्डे 



आष्टीत लॉजमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार


आष्टी ता.२५ (प्रतिनिधी)- तालुक्यात काही हॉटेलच्या नावाखाली अनेक हॉटेल व लॉजमध्ये खुलेआम देहविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असून लॉजच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचे अड्डे बनले आहेत. आष्टी येथील अहमदनगर जामखेड मार्गावरील एका हॉटेल बिअरबार व लॉजिंगमध्ये बुधवारी (ता.१४) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास साकत (ता. जामखेड, जि.अहमदनगर) येथील नराधम शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर (वय ३०) याने १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली असून त्याला श्रीगोंदा न्यायालयाने २६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आष्टी तालुक्यात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला असून तरुण तरुणी पैसा कमावण्याच्या नादात वाम मार्गाकडे वळत असून पोलिसांनी अशा हॉटेल व लॉजची झाडा झडती घेण्याची मागणी (पोलिसांनी अगोदर हॉटेल व लॉज चालकांना सूचना न देता) सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.




आष्टी तालुक्यात कमी कालावधीत जास्त पैसे कमविण्यासाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात लॉज व हॉटेलच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यापैकी काही हॉटेल व लॉजिंग हे पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे विना परवाना सुरू असून येथे मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू बरोबरच वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असल्याचे दिसून येत आहे. लाॅजिंगमध्ये आल्यानंतर खोली भाड्याने देण्या अगोदर ग्राहकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने ओळखपत्र घेणे गरजेचे असते तसेच प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असते परंतु आष्टी तालुक्यात अनेक हॉटेल व लॉजमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही, पोलिसांची कधी रेड पडत नाही (बीड एलसीबी वगळता) तसेच ओळखपत्र घेत नसल्याने येथे महिला बरोबरच अल्पवयीन मुली येण्याचे ही प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. देशाचे भावी आधारस्तंभ तरुण तरुणी हे वाया जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.

या संदर्भात आष्टी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांना बातमी संदर्भात प्रतिक्रियासाठी फोन केला असता त्यांनी तो घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू मांडता आली नाही.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.