नांदा येथे फळ बागेचे मोठे नुकसान

 नांदा येथे फळ बागेचे मोठे नुकसान



दिनांक 4जून रोजी झालेल्या पावसासहित वादळामुळे आष्टी तालुक्यातील नांदा गावच्या श्रीम मंडाबाई दत्तात्रय औटे यांच्या लिंबू बागेचे प्रचंड नुकसान झाले. एक एकर बागेतील 170 झाडांपैकी 55 झाडे वादळामुळे उपटून खाली पडली. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. 



लिंबू बागेला पाच वर्षानंतर चागले उत्पन्न येणास सुरुवात होते,  सात वर्षांपूर्वी लावलेल्या या लिंबू बागेला यावर्षीपासून चागल्या प्रकारे लिंबू येण्यास सुरुवात झाली होती परंतू तोंडाजवळचा घास वादळी वाऱ्यामुळे हिरावून घेतला.   नांदा गावच्या तलाठी श्रीमती शिंदे मॅडम व कृषिसेवक यांनी बागेला प्रत्यक्ष भेट देऊन सदर बागेतील नुकसानभरपाई बाबतचा पंचनामा केला आहे. शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई तात्काळ मिळावी 









Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.