आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नामुळे सिना उजव्या कालव्यातून सिना नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात आले
******************************
**************************
आष्टी (प्रतिनिधी) सिना धरणाच्या डाव्या कालव्याचे लाभ क्षेत्रातील गावे पाणी मिळण्यापासून वंचित राहत असत डावा कालवा नेहमी ना दुरुस्त असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सतत नियमितपणे पाणी मिळालेले नाही त्यामुळे सेना धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सीना नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची आवश्यकता आहे याबाबत आमदार सुरेश यांनी कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांना ३ मे रोजी पत्र देऊन शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी उजव्या कालव्यातून पाणी सोडून सीना नदीवरील बंधारे भरून घ्यावेत याबाबत विनंती केली असता संबंधितांनी त्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन सीना धरणाच्या उजव्या कालव्यातून सेना नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात आले बंधाऱ्यातील पाणी पाहताच या लाभक्षेत्रातील कानडी बुद्रुक, पिंपरी(घु), वाकी, पिंपळसूटी आणि सांगवी आष्टी येथील बंधाऱ्यात पाणी येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत...


stay connected