वादळी वाऱ्या ने पिंपरी आष्टी येथील शहाजीराव भोसले यांच्या शेतातील डाळिंब बागेचे अतोनात नुकसान
अडीच एकर क्षेत्रातील तीन वर्षा च्या डाळींब बागेतील एक हजार झाडे जमीनदोस्त
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ब-याच ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे यांमध्ये खानापूर येथील तावरे कुटुंबांचे घर पडले तर पिंपरी आष्टी येथील शहाजीराव गुलाबराव भोसले यांच्या अडीच एकर क्षेत्रातील तीन वर्षाची डाळींब बागेतील झाडे कोलमडुन जमीनदोस्त झाली असून या मध्ये जवळपास १ हजार झाडा मध्ये ९० टक्के झाडांचे नुकसान झाले आहे. अंदाजे या बागेचे वार्षिक उत्पन्न १८ ते १९ लक्ष असुन आज एवढे मोठे नुकसान शेतकरी शहाजीराव भोसले यांचे झाले आहे.हाता तोंडाला आलेला घास वादळी वाऱ्यासह पावसाच्या नुकसानी हिसकावून घेतला आहे.तलाठी व कृषी सेवकांनी पंचनामा केले असून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकार दरबारी मदत मिळावी अशी मागणी भोसले कुटूंब व शेतकरी वर्गातून केली आहे.




stay connected