भारतीय बौद्ध महासभा केज तालुका अध्यक्षपदी नंदकुमार मस्के तर शहरशाखा अध्यक्षपदी डॉ. प्रभाकर ठोके यांची निवड
केज तालुका शाखेची व शहर शाखेसह इतर कार्यकारणीची निवड जिल्हा कार्यकारणीच्या मार्गदर्शनाखाली संपन्न
केज/ प्रतिनिधी
केज शहरातील माता रमाई बौद्ध विहार फुलेनगर येथे भारतीय बौद्ध महासभा केज तालुका शाखा व शहर शाखेच्या नवनियुक्त कार्यकारणीची निवड भारतीय बौद्ध महासभा बीड अध्यक्ष बाबासाहेब धनवे, भारतीय बौद्ध महासभा बीड पूर्वचे अध्यक्ष भास्कर आरकडे, समता सैनिक दलाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. संतोष बोबडे, कोषाध्यक्ष सुनील शिंदे, संस्कार उपाध्यक्ष श्रीराम मोरे, हिशोब तपासनीस माधवराव काळे, पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष संभाजी सोनवणे, संघटक भारत सातपुते, अरुण पटेकर, मधुकर कदम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप दिपानी पूजा करून वंदन करण्यात आले.
केज तालुका कार्यकारणी:-
तालुका अध्यक्ष नंदकुमार मस्के, सरचिटणीस बालासाहेब जोगदंड, कोषाध्यक्ष बळीराम सोनवणे, उपाध्यक्ष गोरक्षनाथ तुपसागर, रंजीत घाडगे, महिला उपाध्यक्ष विद्याताई कांबळे, उपाध्यक्ष संरक्षण विभाग युवराज हिरवे, संस्कार सचिव जगन्नाथ मिसळे, पर्यटन सचिव आश्रुबा खरात, सचिन उजगरे, महिला सचिव साधनाताई बचूटे, महिला सचिव गौरीताई सरवदे, संरक्षण सचिव भैय्यासाहेब आरकडे, कार्यालयीन सचिव प्रशांत ओव्हाळ, हिशोब तपासनीस धनराज भालेराव, संघटक बाबा पोटभरे, अक्षय घाडगे, सुग्रीव सोनवणे, भगवान घोडके यांची भारतीय बौद्ध महासभा केज तालुका शाखा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा कार्यकारणी:-शहराध्यक्ष डॉ. प्रभाकर ठोके, सरचिटणीस जयपाल मस्के, कोषाध्यक्ष शिवकुमार मस्के, संस्कार उपाध्यक्ष महादेव गायकवाड, पर्यटन उपाध्यक्ष सचिन वाघमारे, महिला उपाध्यक्ष लताबाई वाघमारे, संरक्षण उपाध्यक्ष सुमेध शिंदे, संस्कार सचिव चंद्रकांत मस्के, नितीन धिवार, पर्यटन सचिव हनुमंत शिंदे, अशोक गायकवाड, महिला सचिव अर्चनाताई वाघमारे, संघटक सुदेश शिरसट, प्रेमजीत हजारे गोवर्धन हजारे
यांची भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा केज या कार्यकारणीवर निवड झाली आहे.
या दोन्हीही शाखेच्या कार्यकारणीवर निवड झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


stay connected