स्वर मंदिर संगीत विद्यालय केंद्रातून सोपान पगारे विशारद पूर्ण परीक्षेत प्रथम
------------------
आष्टी/प्रतिनिधी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई मंडळाच्या अंतर्गत एप्रिल, मे 2023 च्या विशारद परीक्षेत केंद्रातून सोपान पगारे, ( पत्रकार) हे मीरजगाव केंद्रातून प्रथम.
स्वर मंदिर संगीत विद्यालय मिरजगाव येथे संगीत अलंकार संजय तुपे, यांच्याकडे सोपान पगारे, याने प्रारंभिक पासून ते विशारद पूर्णचे शिक्षण संगीत अलंकार संजय तुपे यांच्याकडे घेतले. सोपान पगारे यांनी संगीत अलंकार संजय तुपे यांनी दिलेल ज्ञान चांगले आत्मसात करून विशारद पूर्णच्या परीक्षेत स्वर मंदिर संगीत विद्यालय मिरजगाव केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला. संगीत अलंकार संजय तुपे यांच्याकडे हजारो विद्यार्थी तयार झाले . सर्व विद्यार्थ्यांनी आपले नाव लौकिक केले. सध्याच्या काळात सुद्धा अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
विशारद पूर्णच्या परीक्षेत सोपान पगारे हा प्रथम आल्याने पंचक्रोशीतील सर्व संगीत प्रेमींनी व त्यांच्या मित्र कंपनीने सोपान पगारे यांचे खूप मनापासून आभार मानले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


stay connected