चांदा कराटे कप 2023* महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॅम्पीयनशिप 18 जुन ला भद्रावती मध्ये भद्रावती :
:- चंद्रपूर जिल्हयातील क्रिडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच समस्त कराटे खेळाडूंचा सन्मानार्थ अॅमेचर स्पोर्टस कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपूर डिस्ट्रीक्ट ( रजि . ) व एलन थिलक शितो न्यु कराटे स्कूल इंटरनॅशनल , चंद्रपूर जिल्हा शाखे द्वारा भव्य ' *चांदा कराटे कप 2023* ' *महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॅम्पीयनशीप* चे आयोजन *दिनांक 18 जुन 2023 ला* स्थानीक आशिर्वाद मंगल कार्यालय , गुरु नगर , भद्रावती येथे करण्यात आलेले आहे .
*17 जुन हा दिवस संपुर्ण विश्वात ' जागतीक कराटे दिवस* ' म्हणुन साजरा केला जातो , या दिवसाचे औचित्य साधनच या चांदा कराटे कप स्पर्धेचे आयोजन 18 जुन रोजी करण्यात आलेले आहे . या आत्मरक्षणाचे सर्वश्रेष्ठ खेळ म्हणुन संपुर्ण विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ ' कराटे ' या ऑलंपीक मान्यता प्राप्त खेळाच्या नियोजीत विकास व प्रसार करून चंद्रपूर जिल्हयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कराटे पटु निर्माण करण्याच्या एकमात्र उददेशाने या भव्य कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे . स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्हयामधुन जवळपास 400 कराटे पटु व नामांकित कराटे प्रशिक्षक सहभागी होणार आहे . या स्पर्धेचे मुख्य आकर्षन म्हणजे ब्लॅक बेल्ट चॅम्पीयनशिप कुमीते ( मुले व मुली ) तसेच चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन ( मुले , मुली ) या प्रमुख इवेंट मध्ये एकुण 51 हजार रूपयांचे रोख नगद पुरस्कार देण्यात येणार आहे . अॅमेचर स्पोटर्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपूर डिस्ट्रीक्ट चे अध्यक्ष सेंसाई प्रा . दुष्यंत नगराळे , तांत्रिक सल्लागार सिंहान मनिष सारडा , एलन थिलक कराटे कानुनी सल्लगार अॅड . राजरत्न पथाडे , अतुल कोल्हे ( तालुका अध्यक्ष), एलन थिलक स्कुल इंटरनॅशनल चे चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष से साई डॉ . अकुश आगलावे , माँ लक्ष्मी स्पोर्टर्स अकादमीचे अध्यक्ष आशुतोष गयनेवार , सचिव निलेश गुंडावार व स्पोर्टस कराटे असोसिएशनचे संस्थापक सचिव रेंशी दुर्गराज एन . रामटेके ( ब्लॅक बेल्ट 5th डॅन ) यांच्या नेतृत्वात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे .
-- या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुरज जयस्वाल , सादिक थैम ,सुनिल गायकवाड , मनिष भागवत , श्रीहरी गसकंटी , पप्पु सारवान , सुमंत सिंग , सेंसाई बंडु करमनकर , सेंसाई बंडु रामटेके , सेंसाई अमित मोडक , सेसाई संदिप पंधरे , करण डोंगरे , सॅम मानकर , संजय माटे , गोपाळ कळमकर , अजय पाटील , कु . आयुशी रामटेके , कु . पलक शर्मा , आचल हिवरकर , रितीका बोस , क्रिश मोस्कर , आर्या कामरे धन्यवाद !
( *स्पर्धा मुख्य संयोजक - रेंशी दुर्गराज एन . रामटेके , महाराष्ट्र प्रमुख - एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल )


stay connected