Mansoon update :केज तालुक्यात मान्सुन पावसाची दमदार हजेरी वीज पडून गाय ठार, म्हैस पुरात वाहून गेली.

 केज तालुक्यात मान्सुन पावसाची दमदार हजेरी
वीज पडून गाय ठार, म्हैस पुरात वाहून गेली.



=========================


केज (प्रतिनिधी)

 केज तालुक्यातील मांजरा नदी पट्ट्या लगतच्या काही गावात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या मुसळधार पाऊस पडला असून नदी, ओढ्याला पुर आल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे. तर माळेगाव येथे वीज पडून गाय ठार झाली असून मांगवडगाव येथे पुरात म्हैस वाहून गेल्याची घटना घडली आहे.

       जून महिना सुरू होऊन पाऊस न पडल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मांगवडगाव, लाखा, माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी, युसुफवडगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसात माळेगाव ( ता. केज ) येथील शेतकरी अरुण चंद्रसेन गव्हाणे यांनी गाभण गाय शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावात आणून घराजवळील चिंचेच्या झाडाखाली बांधली होती. या पावसात चिंचेच्या झाडावर वीज पडल्याने या झाडाखाली बांधलेली गाय जागीच मरण पावली. तर मांगवडगाव ( ता. केज ) येथील शेतकरी कल्याण तुकाराम गायके यांनी शेतात ओढ्याशेजारी बैलगाडीला म्हैस बांधलेली होती. मुसळधार पावसाने कुंभार ओढ्याला आलेल्या पुरात त्यांची म्हैस वाहून गेली आहे.

       साळेगाव, हदगाव, डोका, चिंचोलीमाळी या गावासह या परिसरातील गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिलाच पाऊस मुसळधार झाल्याने नदी, ओढ्याला पूर आला असून शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग सुखावला असून पेरणीसाठी अशाच दमदार पावसाची गरज आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.