डॉ लक्ष्मण शिवणेकर यांना महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान

 डॉ लक्ष्मण शिवणेकर यांना महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान

_____________________________



महाकवी कालिदास जयंती निमित्त महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान सोहळा आणि निमंत्रितांचे कविसंमेलन 

महाकवी कालिदास प्रतिष्ठान,पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

'साहित्य क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या  साहित्यिकांना महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान करून  19 जून 2023 रोजी पुणे येथे सन्मानित करण्यात आले. 


ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कवितांजली साहित्य समूहाचे (मुंबई) अध्यक्ष, साहित्यिक कवी व गजलकार  डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांना त्यांच्या जीवनातील शैक्षणिक सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल  2023 या वर्षातील महाकवी कालिदास पुरस्कार अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ साहित्यिक तसेच गोवा विधानसभेचे माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर,

यांच्या शुभहस्ते प्रदान करून  पुणे येथे सन्मानित करण्यात आले. 

यापूर्वी डॉ. शिवणेकर यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.


शिक्षण,संशोधन, प्रशिक्षण , प्रशासन आणि साहित्य क्षेत्रात डॉ.  लक्ष्मण शिवणेकर  यांचे एक वेगळे स्थान, वेगळा ठसा आहे. शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन संशोधन, मानसशास्त्र, तत्वज्ञान आदि विषयांवर ग्रंथनिर्मिती केली असून कथा , कादंबरिका, कविता,  नाट्यलेखन इत्यादी केले असून विविध ग्रंथांचे संपादनही केले आहे. अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने "गुरुकिल्ली स्मरणशक्तीची" हा ग्रंथ प्रकाशित केला असून "गजलामृत" हा गझलसंग्रह मुंबईतील डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. 

महाकवी कालिदास जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी 

कविता संग्रहाचे प्रकाशन व  निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक,  वि. ग. सातपुते, कार्याध्यक्ष  काकासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र ठाकुरदास, डॉ. न. म. जोशी, प्रा. सु. द. वैद्य आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.