पालकांनो सावधान आपल्या 18वर्षाच्या खालील मुलांच्या हातात गाडी दिसल्यास होणार 25000रु दंड.
कडा /प्रतिनिधी.
संपुर्ण राज्यामध्ये सरकारने परीपत्रक काढले असून. पालकांनो आता सावधान आपल्या अठरा वर्षाच्या खालील मुलाच्या हातात मोटरसायकल दिल्यास होणार 25000 हजार रुपये दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास.
राज्य सरकारने आज परिपत्रक काढले असून त्यामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी 18 वर्षाखालील मुलांच्या हातात मोटरसायकल किंवा चार चाकी वाहन दिसल्यास पालकांवर थेट कारवाई होणार व 25 हजार रुपये दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास व गाडीचा परवाना रद्द गाडी थेट पोलीस ठाण्यात जमा होणार.
तसेच 18 वर्षाखालील मुलांना आरटीओ मार्फत मिळणारा परवाना मिळणार नाही.
सध्या लहान मुलांच्या हातात मोटरसायकल मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे याला जबाबदार कोण तर याला जबाबदार आहेत पालक पालकाने आपल्या लहान मुलांना मोटरसायकल चालवायला देऊ नये त्याला परिपूर्ण कायदे माहीत नसतात त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रोडवर लहान मुलांच्या हातात गाडी दिसल्यास ती गाडी जप्त करून मुलाला व त्याच्या पालकाला पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्षाचा कारावास आता खावी लागणार तुरुंगाची हवा याची अंमलबजावणी आज मध्ये रात्री पासून सुरू झाली आहे.

stay connected